शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाचा भडका, तेल खरेदीचा झपाटा! महागाई वाढणार, भारताच्या व्यापाराला मोठा  फटका
2
Todays Horoscope: 'या' राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार! कसा असेल तुमचा आजचा दिवस? जाणून घ्या
3
लेख: कमी जागा कोण घेणार? भाजप की शिंदेंची शिवसेना?
4
Mumbai: २ कोटी ३६ लाख... बंद विमा पॉलिसीतील पैशांसाठी दादरमधील आजोबांनी गमावली आयुष्याची जमापुंजी
5
युद्धात उतरली महासत्ता! ऑपरेशन मिडनाइट हॅमर, इराणच्या ३ अणुतळांवर अमेरिकेचे १४ बॉम्ब
6
Iran Israel Conflict: काही दिवस संकटाचे, बाजार कोसळणार? 
7
Mumbai Local Train: मोटरमनच्या केबिनमध्ये आता सीसीटीव्हीचा ‘वॉच’, मुंब्रातील घटनेनंतर काम फास्ट ट्रॅकवर
8
Pahalgam Attack: पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देणारे दोघे अटकेत
9
निम्म्या जगावर इंधनाचे संकट? इराण बंद करणार होर्मुझची सामुद्रधुनी; प्रस्ताव मंजूर
10
विशेष लेख : ...शेवटी ट्रम्प काका म्हणतील तेच खरे!
11
शरीरात लपविलेले २३ कोटींचे अमली पदार्थ जप्त; मुंबई विमानतळावर पाच जणांना अटक 
12
बघ्यांसमोर प्राण सोडला, मृतदेह २ तास रस्त्यावर; पोलिसांची विनंतीही धुडकावली
13
अग्रलेख: भावना दुखावलेल्यांची झुंड, लोकशाही धोक्यात असल्याची ही लक्षणे
14
नालेसफाईतील पैशांचा गाळ नेमका कुणाच्या खिशात? यंत्रणा काय करत होती? 
15
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
16
कोकणात आणखी सहा ग्रोथ सेंटर्स; १०६ गावांत विकास केंद्रे, पर्यटन, कृषी व्यवसायाला चालना   
17
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
18
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
19
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
20
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी

जादा दराने डाळी विकल्यास तुरुंगवास

By admin | Updated: April 27, 2016 02:18 IST

डाळींची विक्री करणाऱ्यास तुरुंगवास आणि दंड करण्याची तरतूद असलेल्या दर नियंत्रक कायद्याच्या मसुद्यास राज्य मंत्रिमंडळाने आज मान्यता दिली.

मुंबई : शासनाने ठरवून दिलेल्या कमाल दरापेक्षा अधिक दराने तुरीसह अन्य डाळींची विक्री करणाऱ्यास तुरुंगवास आणि दंड करण्याची तरतूद असलेल्या दर नियंत्रक कायद्याच्या मसुद्यास राज्य मंत्रिमंडळाने आज मान्यता दिली. जीवनावश्यक वस्तूंचे दर नियंत्रित ठेवण्यासाठी जीवनावश्यक वस्तू अधिनियम, १९५५ च्या कलम ३ (क) अंतर्गत तरतूद करण्यात आली आहे. डाळींसाठी दर नियंत्रक कायदा हा या कायद्याला पूरक म्हणून तयार करण्यात येणार आहे. अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी या बाबत पत्र परिषदेत माहिती दिली.हा कायदा संपूर्ण महाराष्ट्र राज्यासाठी लागू राहणार असून तूर डाळ, चणा डाळ, उडीद डाळ किंवा अन्य कोणत्याही डाळी (आख्खी किंवा भरडाई केलेली) यांना लागू असेल. या कायद्यांतर्गत डाळींबाबत निश्चित करण्यात आलेले दर हे महारपालिका क्षेत्र, जिल्हा व तालुक्याच्या ठिकाणी वेगवेगळे असतील. शासनाने ठरवून दिलेल्या कमाल दरानुसार डाळींची विक्री करणे बंधनकारक असेल.शासन निर्धारित दरापेक्षा जास्त दराने डाळींची विक्री केल्यास या कायद्यानुसार दंड आणि तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. केवळ व्यापारीच नव्हे तर एखादी कंपनी, संस्था किंवा संघटना दोषी आढळली तर त्यांचे व्यवस्थापक, सचिव, दलाल किंवा अन्य संबंधित व्यक्तींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. पोलीस अधिकारी (उपनिरिक्षकापेक्षा वरच्या दर्जाचा अधिकारी) किंवा अन्न व नागरी पुरवठा, महसूल विभगातील अधिकाऱ्यांना प्रकरणांचा तपास करण्याचा अधिकार असेल. या कायद्याचे प्रारुप अध्यादेश काढण्यापूर्वी अनुमतीसाठी राष्ट्रपतींकडे लवकरच पाठविले जाणार आहे. (विशेष प्रतिनिधी)