शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

प्रवाशांच्या सुरक्षेला की भाषेला प्राधान्य देणार?

By admin | Updated: March 1, 2017 06:17 IST

प्रवाशांच्या सुरक्षेला की मराठी भाषेच्या ज्ञानाला प्राधान्य द्याल, अशी उपरोधिक विचारणा उच्च न्यायालयाने मंगळवारी राज्य सरकारकडे केली.

मुंबई : रिक्षाचालकांना अट घालताना प्रवाशांच्या सुरक्षेला की मराठी भाषेच्या ज्ञानाला प्राधान्य द्याल, अशी उपरोधिक विचारणा उच्च न्यायालयाने मंगळवारी राज्य सरकारकडे केली. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी सरकारने आतापर्यंत काय यंत्रणा उभारली आहे, हे पाहणे गरजेचे आहे, असेही उच्च न्यायालयाने म्हटले.रिक्षा-टॅक्सीचा परवाना मिळवण्यासाठी मराठी भाषेचे ज्ञान असणे बंधनकारक असल्याचे एका पत्राद्वारे परिवहन विभागाने राज्यातील सर्व प्रादेशिक परिवहन कार्यालयांना कळवले. या पत्राला मीरा-भार्इंदर रिक्षाचालक संघटना व उपनगरातील अन्य संघटनांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले. न्या. अभय ओक व न्या. अनुजा प्रभुदेसाई यांच्या खंडपीठापुढे या याचिकांवर सुनावणी होती. खंडपीठाने या याचिकांवरील निकाल वाचनास मंगळवारपासून सुरुवात केली. उच्च न्यायालयाने सरकारचे लक्ष कायद्यातील अन्य नियमांकडेही वेधून घेतले. ‘नियमांमध्ये अनेक अटींचा समावेश आहे. रिक्षा-टॅक्सी चालक भाडे नाकारू शकत नाहीत. तसेच त्याने प्रवाशांशी अदबीने वागावे. या अटींचे काय? त्यांचे काटेकोरपणे पालन केले जाते का? प्रवाशांच्या संरक्षणावर भर द्यायचा की भाषेच्या ज्ञानावर? प्राधान्य कोणाला द्यावे? प्रवाशांच्या सुरक्षेला की भाषेला?’ असा प्रश्न उपस्थित करत उच्च न्यायालयाने राज्य सरकारला सुनावले. गैरवर्तन करणाऱ्या रिक्षाचालकांच्या विरोधात तक्रार करण्यासाठी काही तक्रार निवारण यंत्रणेची स्थापना करण्यात आली आहे का, अशी विचारणाही खंडपीठाने राज्य सरकारकडे केली. (प्रतिनिधी)>संरक्षण कसे देणार?‘तक्रारीसाठी काही व्हॉट्सअ‍ॅप नंबर किंवा मोबाइल अ‍ॅप अस्तित्वात आहे का? जर प्रवासादरम्यान एखादा चालक प्रवाशाशी गैरवर्तन करत असेल आणि त्याने तक्रार केली तर त्याला तत्काळ संरक्षण कसे मिळणार?’ अशीही विचारणा खंडपीठाने सरकारकडे केली.