शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

राजकीय पक्षांच्या जाहीरनाम्यात जनतेच्या सूचनांना प्राधान्य

By admin | Updated: April 8, 2017 03:40 IST

पनवेल शहराच्या विकासासाठी महापालिकेकडून आराखडा तयार करण्याचे काम सुरू आहे.

अरुणकुमार मेहत्रे,कळंबोली- पनवेल शहराच्या विकासासाठी महापालिकेकडून आराखडा तयार करण्याचे काम सुरू आहे. त्याचबरोबर राजकीय पक्षांकडून सुध्दा याबाबत ‘व्हिजन’ ठरविण्याकरिता पुढाकार घेतला आहे. महापालिका निवडणुकीला सामोरे जाताना तयार करण्यात येणाऱ्या जाहीरनाम्यात थेट जनतेच्या सूचनांचा विचार करण्यात येत आहे. त्यानुसार भाजपाने ‘आपले शहर आपला अजेंडा’ ही संकल्पना राबवली आहे, तर शेकापने ‘सूचना व्हॅन’ सुरू करून भाजपाला शह देण्यास सुरुवात केली आहे. पनवेलमध्ये महानगरपालिका स्थापन झाल्यावर महापालिकेची ही पहिलीच निवडणूक आहे. शिवाय रायगड जिल्ह्यातील पहिली आणि एकमेव म्हणूनही या महापालिकेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. आशिया खंडातील सर्वात मोठे जंक्शन पनवेल रेल्वे स्थानकावर होत असून नैना, पुष्पकनगर ही दोन प्रस्तावित शहरे बाजूला वसविण्यात येत आहेत. लोह-पोलाद मार्केट, महत्त्वाचे महामार्ग महापालिका हद्दीतून जातात. या सर्व गोष्टींचा विकास होत असताना दर्जेदार पायाभूत सुविधांचीही गरज निर्माण झालेली आहे. सिडकोने नागरी वसाहती विकसित केल्या असल्या तरी अनेक ठिकाणी त्रुटी राहिल्या आहेत. त्यामुळे भविष्यात अनेक प्रश्न गुंतागुंतीचे बनणार आहेत. या भागाकरिता खास व्हिजन ठेवून काम करण्याची गरज निर्माण झालेली आहे. हा मुद्दा उचलत भाजपा आणि शेकापने महापालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवत थेट मतदारांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला आहे. ‘आपले शहर आपला अजेंडा’ अशा आशयाचे बॅनर आणि होर्डिंग्ज लावून भाजपाने पनवेलकरांचे लक्ष वेधले आहे. त्यामध्ये शिक्षण, वैद्यकीय, क्रीडा, सामाजिक, सांस्कृतिक आदी विविध मुद्द्यांना स्पर्श करणारे फलक लावण्यात आले आहेत. या व्यतिरिक्त पक्षाच्या वतीने घरोघरी सूचना पत्रिका पाठवून त्यामध्ये नागरिकांकडून सूचना मागवण्यात आल्या आहेत. सोशल मीडिया, वेबसाईटवर सुध्दा सूचना करण्याबाबत सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. शेतकरी कामगार पक्षाने ‘सूचना व्हॅन’ तयार करून ती वसाहतीत पाठविण्यात येत आहे. बुधवारी ही व्हॅन नवीन पनवेल येथे आली होती. त्यावेळी माजी आमदार विवेक पाटील यांच्यासह माजी नगराध्यक्ष संदीप पाटील यांनी नागरिकांबरोबर संवाद साधला. विशेष करून रेल्वेने प्रवास करणाऱ्यांनी आपले म्हणणे मांडले. त्यांना सूचना पत्रिका सुध्दा देण्यात आल्या होत्या. त्यावर रस्ते, पाणी, वीज या मूलभूत प्रश्नांबरोबर इतर अनेक विषय हाताळण्यात आले. >मोबाइल अ‍ॅप्सवर प्रचारइच्छुक उमेदवार लोकांपर्यंत पोहचण्याकरिता वेगवेगळ्या शक्कल लढवित आहेत. त्याकरिता सोशल मीडियाचा वापर केला जात आहे. या सर्व गोष्टीत माजी नगराध्यक्ष संदीप पाटील यांनी आघाडी घेतली आहे. त्यांनी सर्वात आधी फ्री वायफाय उपलब्ध करून दिले. आता त्यांनी स्वत:चा अ‍ॅप तयार केला असून त्यामध्ये कार्यालयाचे लोकेशन, संपर्क क्रमांक, मतदार याद्या, बातम्या,सामाजिक उपक्र माची माहिती आहे. सोशल मीडियात लिंक करण्याची सोय करण्यात आली आहे.