शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

माथाडी कामगारांना थेट पणनमध्येही प्राधान्य

By admin | Updated: July 4, 2016 03:09 IST

कृषी उत्पन्न बाजार समितीमधील नोंदीत कामगारांना थेट पणन धोरणामध्येही स्थान दिले जाईल.

नवी मुंबई : कृषी उत्पन्न बाजार समितीमधील नोंदीत कामगारांना थेट पणन धोरणामध्येही स्थान दिले जाईल. मार्केटबाहेरील कामांमध्येही त्यांना प्राधान्य दिले जाणार असल्याचे आश्वासन शासनाने दिले आहे. शासनाच्या या निर्णयाचे माथाडी संघटनेने स्वागत केले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत. महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम १९६३ मध्ये सुधारणा करून बाजार समितीच्या आवाराबाहेर फळे व भाजीपाला यांचे व्यवहार नियमन मुक्त करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी करण्यापूर्वी व्यापारी व कामगार या सर्वांचे मत विचारात घेण्यासाठी उपसमिती स्थापन केली होती. समितीची बैठक २ जूनला आयोजित केली होती. या बैठकीमध्ये माथाडी कामगार, वारणार, मापाडी कामगारांबाबत सकारात्मक विचार करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. याशिवाय मार्केटबाहेर शेतकऱ्यांची फसवणूक होवू नये यासाठी स्वतंत्र नियमावली तयार करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयाप्रमाणे लवकरच अधिसूचना काढण्यात येणार आहे. या बैठकीला पणन व सहकार मंत्री चंद्रकांत पाटील, दिवाकर रावते, राम शिंदे, दादाजी भुसे, प्रवीण पोटे, अप्पर मुख्य सचिव सुनील पोरवाल उपस्थित होते. महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे नेते आमदार शशिकांत शिंदे, नरेंद्र पाटील व युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी गत आठवड्यात मुख्यमंत्र्यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली. त्यावेळी झालेल्या चर्चेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कामगारांचे सर्व प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले होते. (प्रतिनिधी)