शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

छुप्या डान्सबारवर छापा, ७५ अटकेत

By admin | Updated: May 21, 2016 05:06 IST

सर्वोच्च न्यायालयाने डान्सबारना परवाने देण्याचे आदेश दिले असताना, समाजसेवा शाखेने अवैध पद्धतीने सुरू असलेल्या डान्सबारना लक्ष्य केले.

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने डान्सबारना परवाने देण्याचे आदेश दिले असताना, समाजसेवा शाखेने अवैध पद्धतीने सुरू असलेल्या डान्सबारना लक्ष्य केले. गुरुवारी समाजसेवा शाखेने मुंबईतील चार डान्सबारवर कारवाई केली. या छापेमारीत तब्बल ७५ जणांना अटक करण्यात आल्याने खळबळ उडाली. यातून ६० बारबालांची सुटका करण्यात आली. समाजसेवा शाखेच्या कारवाई सत्रामुळे बार असोसिएशनच्या भुवया उंचावल्या आहेत. राज्यात डान्सबारसंदर्भात अंमलात आणलेल्या महाराष्ट्र अश्लील नृत्य प्रतिबंधक कायद्याअंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे. शहरातील ज्या डान्सबारने अटी व नियमांची पूर्तता केली आहे अशा बारना परवानगी देण्याचे आदेश सर्वोच न्यायालयाने दिले आहेत. दुसरीकडे न्यायालयाच्या निर्णयाचा विपर्यास करून काही डान्सबार मालकांनी छुप्या पद्धतीने छमछम सुरू केल्याची माहिती समाजसेवा शाखेला मिळाली. त्यानुसार गुरुवारी रात्री समाजसेवा शाखेचे पोलीस उपायुक्त प्रवीण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने गुरुवारी रात्रीच्या सुमारास छापा टाकण्यास सुरुवात केली. ग्रॅण्टरोड येथील तेजस बार, घाटकोपर येथील मेहफिल बार तर अंधेरीच्या पिंक प्लाझा आणि मुंबई सेंट्रल येथील समुंदर बारवर छापा टाकला. या कारवाईत ६० बारबालांची सुटका करत ७५ जणांना अटक करण्यात आली आहे. १२ एप्रिल रोजी विधानसभेत डान्सबार नियमन विधेयक संमत करण्यात आले आहे. या विधेयकानुसार नियमभंग किंवा महिला कर्मचाऱ्यांचे शोषण किंवा बारमध्ये अश्लील नृत्य अशा प्रकारांची जबाबदारी बारमालकावर असणार आहे. नियमभंग केल्यास बारमालकाला पाच वर्षांचा तुरुंगवास आणि २५ हजार रुपये दंड आकारला जाणार आहे. डान्सबार संध्याकाळी सहा ते रात्री साडे अकरापर्यंतच सुरू ठेवावेत अशी तरतूदही त्यात आहे.