शहरं
Join us  
Trending Stories
1
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
2
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
3
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
4
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
5
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
6
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
7
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
8
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
9
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
10
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
11
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
12
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
13
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
14
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
15
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
16
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
17
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
18
विशेष लेख: बाय बाय अमेरिका, आम्ही चाललो!
19
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
20
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला

औषधांच्या कॉल सेंटरवर छापा

By admin | Updated: April 2, 2016 02:14 IST

आॅनलाइन फार्मसीद्वारे मुंबईतून अमेरिका, कॅनडा, आॅस्ट्रेलिया या देशांत सिल्डिनाफिल, टाडानाफिल, व्हेल्डेनाफिलयुक्त शक्तिवर्धक औषधांची किरकोळ विक्री करणाऱ्या बेकायदेशीर कॉल सेंटरवर

मुंबई : आॅनलाइन फार्मसीद्वारे मुंबईतून अमेरिका, कॅनडा, आॅस्ट्रेलिया या देशांत सिल्डिनाफिल, टाडानाफिल, व्हेल्डेनाफिलयुक्त शक्तिवर्धक औषधांची किरकोळ विक्री करणाऱ्या बेकायदेशीर कॉल सेंटरवर अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) दक्षता पथकाने छापा घालून औषधे व प्रसाधने कायद्यांतर्गत कारवाई केली आहे. चांदिवली येथील व्हिबझ टेली सर्व्हिसेस प्रा.लि. या संस्थेद्वारे औषधांची बेकायदेशीर विक्री करण्यात येत होती. या संस्थेतून परदेशात शक्तिवर्धक औषधांची विक्री होत असल्याची माहिती एफडीएच्या दक्षता विभागाला मिळाली होती. त्यानंतर या कंपनीवर पाळत ठेवून छापा घालण्यात आला. त्या वेळी कंपनीच्या कार्यालयात ७० ते ८० आॅपरेटर कार्यरत होते. हे आॅपरेटर अमेरिका, कॅनडा, आॅस्ट्रेलिया आणि जर्मनी या देशांतील ग्राहकांना दूरध्वनीद्वारे संपर्क साधत होते. त्यांच्याकडून सिल्डिनाफिल, टाडानाफिल, व्हेल्डेनाफिलयुक्त औषधांची ३०, ६०, ९०, १०० आणि ४०० नगांची औषधांची आॅर्डर घेताना दिसत होते. प्रत्येक आॅपरेटरला प्रत्येक शिफ्टमध्ये किमान २०० डॉलरची आॅर्डर घेण्याचे बंधनकारक आहे, असे चौकशीदरम्यान समजले. यापैकी कोणतेही औषध डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेतल्यास त्याचे दुष्परिणाम होतात. औषधे व सौंदर्यप्रसाधने कायदा १९४० अंतर्गत आवश्यक असलेले कोणतेही परवाने या कंपनीकडे नव्हते. संस्थेत उपस्थित असलेल्या व्यक्तींनी विक्री करत असलेल्या औषधांची खरेदी, साठवणूक आणि व्रिकी-वितरणासंदर्भातील कोणतीही आवश्यक माहिती, संबंधित कागदपत्रे पडताळणीसाठी उपलब्ध केलेली नाहीत. त्यामुळे या संस्थेला नोटीस बजावण्यात आली आहे. पुढील तपासणी सुरू असल्याचे एफडीए आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे घेतल्यास होणारे दुष्परिणामदृष्टी जाणे, कानात घणघण आवाज होणे, श्रवणशक्ती लोप पावणे, छातीत वेदना होणे, शरीर जड वाटणे, खांद्याला दुखापत, हृदयात धडधडणे, हात-पाय, घोट्याला सूज येणे, चक्कर येणे