शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

गृहविभागाच्या प्रधान सचिवांना स्वत: शपथपत्र दाखल करण्याचे निर्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2017 21:11 IST

राज्याच्या गृह विभागाचे प्रधान सचिव यांनी १६ फेब्रुवारी अथवा त्यापुर्वी स्वत: शपथपत्र दाखल करावे, असे निर्देश दिले आहेत.

ऑनलाइन लोकमतऔरंगाबाद, दि. 8 - शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थिनींच्या छेडछाडीच्या वाढत्या प्रकरणांची गंभीर दखल घेऊन मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. एस. एस. शिंदे आणि न्या. के. के. सोनवणे यांनी राज्याच्या गृह विभागाचे प्रधान सचिव यांनी १६ फेब्रुवारी अथवा त्यापूर्वी स्वत: शपथपत्र दाखल करावे, असे निर्देश दिले आहेत. या संदर्भातील याचिकेवर २० फेब्रुवारी २०१७ रोजी पुढील सुनावणी होणार आहे. औरंगाबाद शहरातील एका अल्पवयीन महाविद्यालयीन विद्यार्थिनीच्या पित्याने दाखल केलेल्या फौजदारी याचिकेच्या अनुषंगाने खंडपीठाने वरीलप्रमाणे आदेश दिले आहेत. फौजदारी याचिका दाखलपीडित मुलीच्या वडिलांनी याचिकेत म्हटल्यानुसार त्यांच्या मुलीला अज्ञात इसम भ्रमणध्वनीद्वारे (मोबाईलद्वारे) अश्लील लघु संदेश (एसएमएस) पाठवून वेळोवेळी कॉल करतो. सदर अज्ञात इसम त्यांच्या मुलीचा पिच्छा पुरवत आहे. त्याच्या लघु संदेशांमुळे आणि मुलीच्या छेडछाडीमुळे संपूर्ण कुटुंब दहशतीच्या सावटाखाली आहे. त्यांची मुलगी महाविद्यालयात जाण्यास आणि शिकवणीच्या वर्गात हजर राहण्यास घाबरत आहे. या छेडछाडीसंदर्भात पीडितेच्या वडिलांनी जिन्सी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. तसेच पोलीस आयुक्तांना सुद्धा यासंदर्भात तक्रार अर्ज दिला होता. जिन्सी पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल केला होता. म्हणून त्यांनी अ‍ॅड. सुदर्शन जी. साळुंके यांच्यामार्फत औरंगाबाद खंडपीठात फौजदारी याचिका दाखल केली आहे. शहरात छेडछाड प्रकरणात वाढयाचिकाकर्त्याने याचिकेत असेही म्हटले आहे की, गेल्या दोन-तीन वर्षांत औरंगाबाद शहरात अनेक विद्यार्थिनींनी छेडछाडीला कंटाळून आत्महत्या केल्या आहेत. पोलिसांच्या असंवेदनशीलतेमुळे छेडछाडीच्या प्रकरणांमध्ये वाढ होत आहे. मुलींची छेडछाड करणाऱ्यांवर पोलीस यंत्रणेचा कोणताही धाक राहिलेला नाही. अशा आरोपींची हिंमत दिवसेंदिवस वाढत आहे. म्हणून विद्यार्थिनींची छेडछाड करणाऱ्या आरोपींविरुद्ध ठोस कार्यवाही करण्याचे आदेश गृह विभाग, औरंगाबादचे पोलीस आयुक्त आणि औरंगाबादेतील जिन्सी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांना द्यावेत, अशी विनंती याचिकाकर्त्याने केली आहे. या प्रकरणात याचिकाकर्त्यांतर्फे अ‍ॅड. सुदर्शन जी. साळुंके तर शासनातर्फे सहायक सरकारी वकील प्रीती डिग्गीकर काम पाहत आहेत.