शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

प्रिन्स करिम आगा खान यांना पद्मविभूषण

By admin | Updated: April 10, 2015 08:49 IST

भारतातील सामाजिक विकासात योगदान देणारे प्रिन्स करिम आगा खान यांना राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते पद्मविभूषण पुरस्काराने

मुंबई : भारतातील सामाजिक विकासात योगदान देणारे प्रिन्स करिम आगा खान यांना राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. दी आगा खान डेव्हल्पमेंट नेटवर्क अंतर्गत सामाजिक उत्तरदायित्व म्हणून आजवर अनेक समाजपयोगी कामे करण्यात आली, तर अनेकांना त्यातून आयुष्य जगण्याची प्रेरणा मिळाली.गेल्या शंभर वर्षांपासून दी आगा खान डेव्हल्पमेंट नेटवर्क भारतात कार्यरत आहे. १९०५ साली गुजरामधील मुंद्रा येथे पहिली आगा खान शाळा स्थापन झाली. आजघडीला दी आगा खान डेव्हल्पमेंट नेटवर्क सरकारसोबत संपूर्ण देशात कार्यरत आहे. आरोग्य, संस्कृती, शिक्षण, बालविकास, ग्रामविकास, नागरी समस्या आणि जल अशा विविध क्षेत्रातील विकासासाठी त्यांनी भरीव योगदान दिले आहे.२ हजार ५०० गावांत ग्रामीण सहयोग प्रकल्प, ४०० शाळांत ग्रामीण शैक्षणीक कार्यक्रम, बहुराज्यस्तरीय मलनि:स्सारण प्रकल्प, समाजपयोगी प्रकल्प, २७ शाळा, अत्याधुनिक रुग्णालयांसह कर्करुग्णांचे पुनर्वसन केंद्राद्वारे आगा खान डेव्हल्पमेंट नेटवर्कने समाजकार्याची पाळेमुळे तळागाळात रोवली आहेत.इस्लाम धर्माच्या शिया पथांचे प्रिन्स करिम आगा खान हे ४९ वे धार्मिक गुरु आहेत. १३ डिसेंबर १९३६ रोजी स्विर्त्झलंडमधील जिनिव्हा येथे त्यांचा जन्म झाला. नैरोबी, केनिया येथे बालपण व्यतित केले. स्विर्त्झलंडमधील ली रोझी शाळेतून त्यांनी शालेय शिक्षण पूर्ण केले. हॉर्वर्ड विद्यापीठातून ‘इस्लामिक हिस्ट्री’ विषयांत पदवी संपादन केली.