शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
2
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
3
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
4
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
5
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
6
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
7
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
8
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
9
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
10
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
11
..त्यामुळे हिंदी सक्तीचे नकोच; राज्य शासनाने हट्ट सोडावा, शरद पवार यांचा सल्ला 
12
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
13
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
14
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
15
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
16
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
17
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
18
दोन दिग्गज एकत्र आले; अदानी-अंबानी यांच्यात मोठा करार, 'या' क्षेत्रात क्रांती घडणार...
19
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका
20
काँग्रेस नेते शशी थरुर अचानक रशिया दौऱ्यावर; रशियन परराष्ट्र मंत्र्यांची घेतली भेट, कारण काय?

महानिर्मितीच्या विद्युत संचांचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते लोकार्पण

By admin | Updated: April 14, 2017 12:21 IST

नागपुरात महानिर्मितीच्या कोराडी येथील तीन संचाचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले.

ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 14 - महानिर्मितीच्या कोराडी येथील तीन संचाचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. शुक्रवारी पारडलेल्या एका दिमाखदार सोहळ्यात वीज संचाचे लोकार्पण केल्यानंतर पंतप्रधान मोदींनी कोराडी वीज प्रकल्पाची पाहणी करीत महानिर्मितीच्या कार्याचे कौतुक केले.
 
कोराडी येथील वीज प्रकल्पात यानिमित्त आयोजित समारंभाला राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कायदे आणि न्यायमंत्री रविशंकर प्रसाद, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर, केंद्रीय ऊर्जामंत्री पियुष गोयल, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खा. कृपाल तुमाने यांची प्रमुख उपस्थिती होती.
(डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ट्विटरचे खास हॅशटॅग)
कोराडी येथील तीन संच १४ हजार ८०० कोटी रुपये खर्च करून तयार करण्यात आले आहे. यामध्ये १७० मीटर उंचीचे तीन कुलिंग टॉवर असून चिमणीची उंची २७५ मीटर आहे. प्रकल्पाला ९.१ मिलियन मेट्रिक टन कोळसा आणि ६४ दलघमी पाणी प्रत्येक युनिटला लागणार आहे. यातीलन ४९.५ दलघमी पाणी नागपूर महापालिकेकडून सांडपाण्यावर प्रक्रिया करून घेण्याच्या उपक्रमाचाही यावेळी शुभारंभ करण्यात आला. 
(पंतप्रधान मोदींनी वाहिली डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली)
चंद्रपुरातील दोन वीज संचावर ७००४ कोटी खर्च करण्यात आले असून १६७ हेक्टर जागेत ते उभारण्यात आले आहे. परळीतील संचावर २०८१ कोटी रुपये खर्च करण्यात येऊन तो १३० हेक्टर जागेमध्ये आहे. 
कोराडी येथील तिन्ही संच हे जपानच्या सुपर क्रिटिकल तंत्रज्ञानावर आधारित राज्यातील पहिले विद्युत संच आहे, हे विशेष! त्यामुळे उत्पादन खर्चात आणि त्यासोबतच प्रदूषणातही घट होणार आहे.
 
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 126 व्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दीक्षाभूमी येथे भेट देऊ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिकलशाचे दर्शन घेतले आहे. व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पाहार अर्पण करुन त्यांना अभिवादन केलं.   शिवाय, तेथील गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेलाही अभिवादन केले.