शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

प्राथमिक शिक्षकांना मतदानाचा हक्क मिळावा

By admin | Updated: May 13, 2014 19:13 IST

संघाची मागणी * अन्यथा न्यायालयात जाण्याचा इशारा

अकोला: अमरावती विभागीय शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत प्राथमिक शिक्षकांना मतदानाचा हक्क मिळावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य खासगी प्राथमिक शिक्षक संघाने मंगळवारी मुख्य निवडणूक आयुक्तांना पाठविलेल्या पत्रात केली आहे. लोकसभा निवडणुकीनंतर आता अमरावती विभागीय शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. प्रत्येक शिक्षक संघटना व राजकीय पक्ष चाचपणी करीत आहेत. निवडणुकीसाठी प्रशासनानेही कंबर कसली असून, नोंदणी आणि पडताळणीच्या प्रक्रियेला वेग आला आहे. यासाठी अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयातून हरकती मागविण्यात येत आहे. दरम्यान, महाराष्ट्र राज्य खासगी प्राथमिक शिक्षक संघाने निवडणुकीत प्राथमिक शिक्षकांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी पुढाकार घेतला आहे. शिक्षकांच्या समस्या मांडण्याकरिता शिक्षकांचा प्रतिनिधी विधान परिषदेत पाठविण्यात येतो; मात्र शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत प्राथमिक शिक्षक हे मतदार नाहीत. परिणामस्वरूप शिक्षकांच्या समस्यांवर सभागृहात गांभीर्याने चर्चा होत नाही, असे खासगी शिक्षक संघाचे अध्यक्ष मनीष गावंडे यांनी मुख्य निवडणूक आयुक्तांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे. त्यामुळे निवडणुकीत प्राथमिक शिक्षकांना मतदानाचा हक्क मिळावा, अशीही मागणी त्यांनी केली आहे.