मुंबई : दादर, झवेरी बाजार व ऑपेरा हाऊस येथे बॉम्बस्फोट केल्याचा अभिमान असल्याचा धक्कादायक दावा अतिरेकी यासिन भटकळने जबाबात केला. विशेष म्हणजे 2क्क्5 पासून झालेले बॉम्बस्फोट हे माझी संघटना इंडियन मुजाहिदीनने केले आहेत. तसेच या माध्यमातून दंगली घडवण्याचा हेतू होता. याचा पश्चात्ताप नसल्याने गुन्ह्याची कबुली देत असल्याचेही यासिनने पोलिसांना सांगितले. (प्रतिनिधी)