शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

सणासुदीच्या तोंडावर भाववाढीचा फटका

By admin | Updated: October 18, 2016 19:49 IST

ऐन सणासुदीला जीवनावश्यक वस्तुंच्या दरात झालेल्या वाढमुळे गृहिणींचे बजेट पुन्हा कोलमडणार असल्याचे दिसून येत आहे. दिवाळी सण मोठा

ऑनलाइन लोकमत
खामगाव, (जि.बुलडाणा), दि. 18 -  ऐन सणासुदीला जीवनावश्यक वस्तुंच्या दरात झालेल्या वाढमुळे गृहिणींचे बजेट पुन्हा कोलमडणार असल्याचे दिसून येत आहे. दिवाळी सण मोठा नाही आनंदाला तोटा अशा सर्वात मोठ्या सणाच्या तोंडावर विविध जीवनावश्यक वस्तुंच्या किंमतीमध्ये भाववाढ झाली असल्याचे दिसून येत आहे. यामध्ये गत महिन्यात हरभरादाळीचे प्रतिकिलो भाव ८० ते ८५ रुपये किलो होते मात्र आता १२० ते १२५ रुपये किलो झाले आहेत. तसेच तूरदाळ १०० रुपयांच्यावर ११० ते ११५ रुपये किलो झाली आहे. साखरेनेही चाळीशी ओलांडली असून ४० ते ४२ रुपये प्रतिकिलो साखरचे भाव झाले आहेत. सोयाबीन तेलाचे दरात   वाढ होवून ६८ वरुन ७५ रुपये किलो झाले आहेत तर शेंगदाणा तेल १२० वरुन १३५ रुपये लिटर झाले आहे.शेंगदाणे ९० वरुन शंभरच्यावर ११० ते १२० रुपये किलो, गूळ ४० ते ४५ वरुन ५० रुपये, साबुदाणा ४०-४२ वरुन ६० ते ६४, पोहे ३० रुपये वरुन ३५ रुपये, मैदा २२ वरुन २८ रुपये रवा २२ वरुन २८ रुपये, जिरा १६० रुपये प्रतिकिलोवरुन २४० रुपये झाले आहेत. तसेच इतर आवश्यक वस्तुंच्या दरातही वाढ झाली आहे. काही वस्तुंची भाववाढ प्रत्यक्षात दिसून येत नसली तरी वजनात घट करण्यात आली आहे. विशेष म्हणजे ज्या वस्तुंच्या कच्च्या मालाचे दरात वाढ झाली नाही, अशा वस्तुंची सुध्दा चढ्या भावात महागाईचे नावाखाली विक्री होत असल्याचे बाजारपेठेत दिसून येत आहे. यामुळे ऐन दिवाळी सणाच्या काळात गृहिणींचे बजेट कोलमडणार असून दिवाळीत हा महागाईचा चटका सहन करावा लागणार आहे.