शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

चुकीच्या निकषांमुळे मुलाखती रोखल्या

By admin | Updated: August 12, 2016 04:23 IST

राज्याच्या आरोग्य सेवा संचालकपदासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांचे ‘शॉर्ट लिस्टिंग’ करताना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने चुकीचे आणि अन्याय्य निकष लावल्याचा मुद्दा

मुंबई : राज्याच्या आरोग्य सेवा संचालकपदासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांचे ‘शॉर्ट लिस्टिंग’ करताना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने चुकीचे आणि अन्याय्य निकष लावल्याचा मुद्दा उपस्थित झाल्याने महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाने (मॅट) या पदासाठी होऊ घातलेल्या मुलाखती ऐनवेळी रोखल्या आहेत.आयोगाने या पदासाठी १९ फेब्रुवारी रोजी जाहिरात देऊन इच्छुकांकडून आॅनलाईन अर्ज मागविले होते. त्यानुसार एकूण ४५ जणांचे अर्ज आले. त्यापैकी दोघांना प्रथमदर्शनी अपात्र ठरविले गेले. बाकीच्या ४३ अर्जदारांचे ‘शॉर्ट लिस्टिंग’ करण्यासाठी दोन निकष ठरविले गेले. त्यानुसार ३३ उमेदवारांना अपात्र ठरविले गेले. पात्र ठरलेल्या १० उमेदवारांच्या ८ आॅगस्ट रोजी मुलाखती घेण्यात यायच्या होत्या. मात्र त्याआधीच हे ‘शॉर्ट लिस्टिंग’ व मुलाखतींना आव्हान देणाऱ्या याचिका केल्या गेल्याने पुढील आदेश होईपर्यंत मुलाखती घेऊ नका, असा आदेश ‘मॅट’चे उपाध्यक्ष व न्यायिक सदस्य आर. बी. मलिक यांच्या पीठाने दिला.सध्याचे प्रभारी काम पाहात असलेले डॉ. मोहन आप्पाराव जाधव, डॉ. रत्ना डी. रावखंडे (डॉ. रत्नछाया पांडुरंग शिवदास) व सिव्हिल सर्जन कॅडर ग्रुप ए (डॉक्टर्स) असोसिएशन यांच्यातर्फे त्यांचे अध्यक्ष डॉ. एकनाथ धोंडिबा माले यांनी याचिका केल्या आहेत. लगेच अंतिम सुनावणी घेण्याचे ‘मॅट’ने ठरविले असून १८ आॅगस्ट रोजी युक्तिवाद होईल. (विशेष प्रतिनिधी)चुकीची सांगड व प्राधान्यसरकारच्या या अभिप्रायानुसार ‘शॉर्ट लिस्टिंग’साठी निकष ठरविताना आयोगाने ‘क्लिनिकल सब्जेक्ट’मधील पदव्युत्तर पदवी व ‘प्रिव्हेंटिव्ह अ‍ॅण्ड सोशल मेडिसिन’मधील पदव्युत्तर पदवी यांची एकत्र मोट बांधली, शिवाय त्याच्याशी ‘पब्लिक हेल्थ’मधील पदविकेचीही सांगड घातली. वस्तुत: ‘प्रिव्हेंटिव्ह अ‍ॅण्ड सोाशल मेडिसिन’ व ‘पब्लिक हेल्थ’ हे समकक्ष विषय आहेत व पदविकेपेक्षा पदवी ही उच्च अर्हता असल्याने पदविकेला वेगळे ‘वेटेज’ देणे गैर आहे.१राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून लोकसेवा आयोगास चुकीचा अभिप्राय दिला जाणे, हे या वादाचे मूळ असल्याचे दिसते. आरोग्य सेवा संचालकपदाच्या सेवानियमांत व आयोगाने दिलेल्या जाहिरातीत ‘क्लिनिकल सब्जेक्ट’मधील पदव्युत्तर पदवी व ‘पब्लिक हेल्थ’मधील पदव्युत्तर पदविका धारण करणाऱ्यांना प्राधान्य देण्याची तरतूद आहे.२तथापि ‘प्रिव्हेंटिव्ह अ‍ॅण्ड सोशल मेडिसिन’ विषयातील पदव्युत्तर पदवी ही ‘क्लिनिकल सब्जेक्ट’मधील पदव्युत्तर पदवी आहे का? परिणामी अश पदवी व पदविकाधारकांना प्राधान्य देता येईल का? यावर लोकसेवा आयोगाने २१ जूनच्या पत्राने अभिप्राय मागितला होता. ३यावर सरकारच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने ‘प्रिव्हेंटिव्ह अ‍ॅण्ड सोशल मेडिसिन’ विषयातील पदव्युत्तर पदवी ही ‘क्लिनिकल सब्जेक्ट’मधील पदव्युत्तर पदवी आहे, असा अभिप्राय आयोगास ८ जुलैच्या पत्राने कळविला. याचा निर्णय करण्याचा अधिकार फक्त मेडिकल कौन्सिलला आहे व कौन्सिलने ‘कम्युनिटी मेडिसिन’ (म्हणजेच प्रिव्हेंटिव्ह अ‍ॅण्ड सोशल मेडिसिन) हा विषय ‘नॉन क्लिनिकल’ विषय असल्याची अधिसूचना यापूर्वीच काढली आहे.