शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

निधी वाटपात भेदभाव टाळणार, मुख्यमंत्र्यांचं सेनेच्या मंत्र्यांना आश्वासन

By admin | Updated: March 31, 2017 11:52 IST

भाजपा मंत्री, आमदारांनाच सर्वाधिक निधी मिळतो, असा शिवसेनेचा आरोप आहे. या पार्श्वभूमीवर सेनेच्या नाराज मंत्र्यांनी शुक्रवारी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली.

ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. 31 -  शिवसेनेच्या नाराज मंत्र्यांनी शुक्रवारी सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा बंगल्यावर भेट घेतली. राज्यात युतीची सत्ता असली तरीही भाजपा आमदार आणि मंत्र्यांनाच सर्वाधिक निधी मिळतो, तर शिवसेनेच्या नेत्यांच्या वाट्याला केवळ आश्वासन येतात, असा शिवसेनेच्या मंत्र्यांचा आरोप आहे. यापार्श्वभूमीवर शिवसेनेचे नेते आणि पर्यावरण मंत्री रामदास कदम व जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. 
 
या भेटीदरम्यान मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेच्या या नेत्यांना " यापुढे असं काहीही होणार नाही. निधी वाटपाबाबत कोणावरही अन्याय करणार नाही",असं आश्वासन दिल्याचे रामदास कदम यांनी सांगितले. शिवसेना-भाजपाच्या आमदारांना समान निधी वाटप केलं जाईल, असंही मुख्यमंत्री म्हणाले. मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनावर पूर्ण विश्वास असल्याचे कदम म्हणाले.  
 
 
दरम्यान, भाजपाशी काडीमोड घेत राज्य सरकारमधून बाहेर पडण्याची भूमिका घेतली जाणार नाही पण सरकारमध्ये राहून संघर्ष मात्र करीत राहा, असे आदेश शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज पक्षाच्या मंत्र्यांना दिले. विश्वसनीय सूत्रांनी ही माहिती दिली. ठाकरे यांनी गुरुवारी रात्री मातोश्रीवर शिवसेनेच्या मंत्र्यांची बैठक घेतली. पक्षाचे कॅबिनेट आणि राज्यमंत्री बैठकीला उपस्थित होते. सरकारला असलेला शिवसेनेचा पाठिंबा कायम राहील पण भाजपासमोर झुकण्याचे काहीही कारण नाही. आपल्या आमदारांची कामे झाली पाहिजेत, त्यांना जास्तीतजास्त निधी विकास कामांसाठी मिळाला पाहिजे यासाठी मुख्यमंत्री आणि भाजपाच्या इतर मंत्र्यांवर दबाव आणा, असे आदेश ठाकरे यांनी दिल्याचेही सूत्रांनी सांगितले.