शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

विनयभंगाची तक्रार मागे घेण्यास दबाव

By admin | Updated: July 7, 2014 03:53 IST

विनयभंगप्रकरणी साकीनाका पोलीसांत तक्रार दाखल करणाऱ्या पिडीत युवतीने तक्रार मागे घेण्यासाठी साकीनाका पोलिसांनी अप्रत्यक्ष दबाव आणल्याचा आरोप

मुंबई : व्हॉटस अपवर अश्लिल छायाचित्रे पाठवून झालेल्या विनयभंगप्रकरणी साकीनाका पोलीसांत तक्रार दाखल करणाऱ्या पिडीत युवतीने तक्रार मागे घेण्यासाठी साकीनाका पोलिसांनी अप्रत्यक्ष दबाव आणल्याचा आरोप करीत या गुन्ह्याचा तपास गुन्हे अन्वेषण विभागाच्या महिला अत्याचार प्रतिबंधक विभागाकडे सोपवण्याची मागणी मुख्यमंत्री आणि पोलीस आयुक्तांकडे केली आहे. खासगी कंपनीत काम करणाऱ्या या युवतीला दोन महिन्यांपूर्वी तिचा एक शाळकरी मित्र प्रविण शेट्टी भेटला होता. त्यावेळी त्याने व्हॉटस अपवर शाळेतील माजी विद्यार्थ्यांनी एक ग्रुप केला. या गु्रपद्वारे आपण संपर्कात राहू शकतो, असे सांगत तिचा मोबाईल क्रमांक घेतला. त्यानंतर त्याने ग्रुपवर अ‍ॅड करून तिला मेसेज पाठवण्यास सुरूवात केली. काही दिवसांनी प्रविणने एकूण २१ अश्लिल छायाचित्रे पाठवली. ही बाब तिने आरटीआय कार्यकर्ते मोहन कृष्णन यांना सांगताच त्यांनी साकीनाका पोलीस ठाण्यात जाण्याचा सल्ला दिला. त्यानुसार महिला पोलीस उपनिरीक्षक अश्विनी जाधव यांनी तपास करीत भादंविसह ६७ अ आयटी अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल करून साकीनाका येथील परेरावाडीत राहाणाऱ्या शेट्टी याला अटक केली होती. शेट्टीविरूद्ध तक्रार दाखल करताना आपल्या आईवडिलांना तसेच भावाला मानसिक ताण येऊ नये यासाठी या प्रकाराची कल्पना दिली नसल्याचे पिडीत युवतीने स्पष्ट करीत आपल्या घरी गणवेशातील पोलीस पाठवू नये, अशी विनंतीही पोलीस अधिकाऱ्यांना केली होती. त्यानुसार वरीष्ठ अधिकाऱ्यांनीही याबाबत खात्री दिली होती. पण १९ जून रोजी जबाब नोंदवत असतानाच आपले नाव नाईक असल्याचे सांगणारा एक बीट मार्शल थेट आपल्या घरी गेला आणि त्याने आपल्या भावाला दमदाटी केल्याचे युवतीने सांगितले. (प्रतिनिधी)