शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

निर्णय फिरवण्यासाठी मुख्यमंत्र्यांवर दबाव

By admin | Updated: December 22, 2014 03:15 IST

आघाडी सरकारच्या काळातील मंत्र्यांकडे असलेले पीए, पीएस आणि ओएसडी यांना पुन्हा त्याच पदावर मंत्रालयात न घेण्याच्या निर्णयावर ठाम राहण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठरविले

यदु जोशी, नागपूरआघाडी सरकारच्या काळातील मंत्र्यांकडे असलेले पीए, पीएस आणि ओएसडी यांना पुन्हा त्याच पदावर मंत्रालयात न घेण्याच्या निर्णयावर ठाम राहण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठरविले आहे. त्याचप्रमाणे जे अतिरिक्त जिल्हाधिकारी वा उपजिल्हाधिकारी बदल्यांच्या ठिकाणी जाणार नाहीत त्यांच्यावर कारवाई करण्यावरही ते तेवढेच ठाम आहेत. तीन लाख रुपयांवरील कुठल्याही सरकारी कामाचे ई-टेंडर झाले पाहिजे, असा आदेश मुख्यमंत्र्यांनी काढला असून, तो बदलण्यासाठी आमदारांकडून आलेला दबावही मुख्यमंत्र्यांनी झुगारला आहे. आपला निर्णय पारदर्शक कारभारासाठी अत्यावश्यक असल्याने तो बदलणार नाही, असे त्यांनी आमदारांना निक्षून सांगितले आहे. पाच लाख वा त्यावरील रकमेच्या कामाचे ई-टेंडर काढावे,अशी आमदारांची मागणी होती. बरेच आमदार त्यांना येऊनही भेटले, पण त्यांनी त्यास नकार दिला. आमदार निधी व विकासाची इतर कामे मजूर सहकारी सोसायट्यांच्या माध्यमातून घेण्यात येतात. या सोसायट्यांमध्ये बरेचदा स्थानिक लोकप्रतिनिधींचे नातेवाईक वा निकटवर्ती असतात. या मजूर सोसायट्यांनी गेल्या काही वर्षांत केलेले घोटाळे बाहेर काढले गेले तर कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार समोर येईल, असे मत मंत्रालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने व्यक्त केले.मुंबई, पुणे, ठाणे, नाशिकमध्ये वर्षानुवर्षे ठाण मांडून बसलेले अतिरिक्त जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकाऱ्यांच्या मुख्यमंत्र्यांनी विदर्भ, मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात बदल्या केल्या आहेत. आठ दिवसांत रुजू न झाल्यास या अधिकाऱ्यांवर कारवाई करा, असे मुख्यमंत्र्यांचे आदेश आहेत. मुख्यमंत्र्यांनी आदेश बदलावा म्हणून अधिकाऱ्यांच्या संघटनेचे नेते विधानभवनात गेल्या आठवडाभर फिरत होते. यासाठी काही मंत्र्यांना हाताशी धरण्याचाही प्रयत्न त्यांनी केला; पण मुख्यमंत्री निर्णय फिरवणार नाहीत. त्यामुळे आम्ही तुम्हाला मदत करू शकत नाही, असे मंत्र्यांनी या नेत्यांना सांगितल्याची माहिती आहे.गेली दहा वर्षे पीए, पीएस, ओएसडी राहिलेले लोक तर अजूनही काही मंत्र्यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांवर दबाव आणण्याचा प्रयत्न करीत असल्याची माहिती आहे; पण मुख्यमंत्र्यांनी कोणालाही दाद दिलेली नाही.