शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

अत्याचारग्रस्त चिमुकलीच्या कुटुंबावर जात पंचायतचा दबाव!

By admin | Updated: November 19, 2016 01:46 IST

आश्रमशाळा लैंगिक शोषण प्रकरणात पीडितेच्या कुटुंबावर जात पंचायत दबाव आणला जात आहे.

अनिल गवईखामगाव, दि. १८- पाळा येथील आश्रमशाळेतील विद्यार्थिनींच्या लैंगिक शोषणाचा प्रकार उघडकीस आल्यानंतर तक्रार करणार्‍या पीडितेच्या कुटुंबाला जात पंचायतकडून आपल्या समाजात तक्रार देण्याची प्रथा नसल्याचे सांगून दबाव आणला जात आहे. आदिवासी आश्रमशाळेत दोन विद्यार्थिनींच्या लैंगिक शोषणाचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर दोन वेगवेगळ्या तक्रारींवरून मुख्य आरोपी इत्तूसिंग पवार याच्यासह १७ आरोपींविरोधात कारवाईचा फास आवळण्यात आला. या प्रकरणाच्या चौकशीदरम्यान, नवनवीन सत्य उजेडात येत आहे. घटना उघडकीस आल्यापासून सातपुड्याच्या पर्वत रांगेतील संबंधित समाजातील जात पंचायत पदाधिकार्‍यांसह अमरावती जिल्ह्यातील जात पंचायतच्या काही पदाधिकारी मुक्ताईनगर तालुक्यातील हलखेडा येथे तळ ठोकल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. पीडितेच्या नातेवाइकांची जात पंचायतकडून वेगळी चौकशी केली जात आहे. पोलिसांत तक्रार देण्यापूर्वी जात पंचायतसमोर सदर प्रकरण का आणले नाही, असा सवाल करून आपल्या समाजात पोलिसांत तक्रार करण्याची प्रथा नाही, यासह विविध प्रश्नांचा भडिमार केला जात असल्याची धक्कादायक माहिती आहे.

हलखेडावासीयांकडून धीर !जात पंचायतच्या या चौकशीमुळे दोन्ही पीडित विद्यार्थिनींच्या नातेवाइकांसमोर वेगळे संकट उभे राहिले आहे. हलखेडा आदिवासी पाड्यातील आदिवासी बांधवांकडून मात्र या कुटुंबाला धीर दिला जात असल्याची माहितीही चौकशीत समोर आली आहे.

- घडलेली घटना अतिशय दुर्दैवी आहे. या घटनेच्या तक्रारीबाबत हलखेडा येथील आदिवासी बांधवांकडून अत्याचारग्रस्त विद्यार्थिनीच्या नातेवाइकांवर कोणताही दबाव नाही. या कुटुंबाचे आम्ही समूपदेशन करतोय. जात पंचायत पदाधिकार्‍यांच्या दबावाबाबत आपणाला माहीत नाही. शासनाने अत्याचारग्रस्त विद्यार्थिनींच्या कुटुंबीयांना मदत करावी.- बॅलिस्टरनी सती भोसले, माजी सरपंच, हलखेडा आदिवासी ग्राम.