शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रपतिपदी हवी बिगर राजकीय व्यक्ती

By admin | Updated: June 16, 2017 00:47 IST

राष्ट्रपतिपदी कोण येणार, यासंदर्भात सर्वत्र तर्कवितर्क लढविले जात आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मात्र यासंदर्भात मौन राखले आहे. मात्र या पदावर बिगर राजकीय

- योगेश पांडे। लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रपतिपदी कोण येणार, यासंदर्भात सर्वत्र तर्कवितर्क लढविले जात आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मात्र यासंदर्भात मौन राखले आहे. मात्र या पदावर बिगर राजकीय व देशभरात जिच्याकडे आदरयुक्त भावनेने पाहिले जाते, अशी व्यक्तीच विराजमान व्हावी, असा सूर संघ परिवारातून येत आहे. राष्ट्रपतींच्या नावाला एकमुखी मान्यता मिळावी, असे रालोआतर्फे प्रयत्न सुरू आहेत तर काँग्रेससह विरोधकांनी एकत्र येत मोट बांधली आहे. रालोआचे संभाव्य उमेदवार म्हणून अनेकांची नावे समोर आली आहेत. यात लोकसभेच्या अध्यक्ष सुमित्रा महाजन, अकाली दलाचे अध्यक्ष प्रकाशसिंह बादल, झारखंडच्या राज्यपाल द्रौपदी मुर्मू, उद्योगपती रतन टाटा, इतकेच काय तर सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या नावाचीदेखील चर्चा ‘सोशल मीडिया’वर रंगली आहे.संघ वर्तुळात बहुतांश स्वयंसेवकांची अपेक्षा वेगळी आहे. राजकीय व्यक्ती राष्ट्रपतिपदी आली की वाददेखील येण्याची शक्यता असते. त्यामुळे या पदावर निष्कलंक, समाजासाठी झटणारा व सर्वमान्य प्रतिमा असणारी व्यक्तीच हवी. रालोआने असा गैरराजकीय उमेदवार दिला पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. राजकीय समीकरणे लक्षात घेता राजकीय उमेदवार द्यावाच लागला तर संबंधित व्यक्ती प्रामाणिक, वादापासून दूर व समाजात आदर प्राप्त केलेली हवी, अशी संघाच्या राष्ट्रीय पातळीवर सदस्यांचीदेखील भावना आहे. राष्ट्रपतिपदाचा रालोआचा उमेदवार कोण असेल हे संबंधित पक्ष ठरवतीलच. संघाचा तो विषय नाही. मात्र या पदावर प्रामाणिक, सर्वमान्य व पात्र व्यक्ती हवी ही अपेक्षा आहे. डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या रूपाने एक ‘व्हिजनरी’ राष्ट्रपती लाभले होते. त्यांच्यासारखीच समर्पित व्यक्ती राष्ट्रपतीपदी विराजमान झाली तर देशाचा गौरव वाढेल, असे मत संघाच्या अखिल भारतीय पातळीवरील एका पदाधिकाऱ्याने गोपनीयतेच्या अटीवर ‘लोकमत’कडे व्यक्त केले.