शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

शिपाई झाला स्थायी समितीचा अध्यक्ष

By admin | Updated: March 6, 2016 01:20 IST

महापालिकेच्या नगरसचिव विभागामध्ये शिपाई म्हणून काही काळ काम केलेले बाळासाहेब बोडके यांची महापालिकेचा आर्थिक कणा असलेल्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याने पालिकेच्या तिजोरीचा चालक

पुणे : महापालिकेच्या नगरसचिव विभागामध्ये शिपाई म्हणून काही काळ काम केलेले बाळासाहेब बोडके यांची महापालिकेचा आर्थिक कणा असलेल्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याने पालिकेच्या तिजोरीचा चालक बनण्याचा बहुमान त्यांना प्राप्त झाला आहे. बोडके यांचे वडीलही नगरसचिव कार्यालयात नोकरीला होते; तसेच त्यांच्या मामांनी महापौरांचे जमादार म्हणून काम केले आहे. त्यामुळे पालिकेशी जुना ऋणानुबंध असलेल्या बोडकेंना आजतिथला विश्वस्त बनण्याचा मान मिळाला आहे.महापालिकेमध्ये शिवाजीनगर भागातून नगरसेवक म्हणून बाळासाहेब बोडके तिसऱ्यांदा निवडून आले आहेत. त्यांना पहिल्यांदा मोठ्या पदावर काम करण्याची पक्षाच्या वतीने संधी देण्यात आली आहे. बोडके यांचे वडील काळुराम बोडके नगरसचिव विभागात १९७८ पर्यंत कार्यरत होते. वडिलांचे निधन झाल्यानंतर त्यांच्या जागेवर अनुकंपाखाली बाळासाहेब बोडके १९७८ मध्ये पालिकेत नोकरीला लागले. त्यांनी ५ वर्षे शिपाई म्हणून काम केले आहे. त्यांचे मामा कोंडिबा पडळधरे यांनी पालिकेत जमादार म्हणून काम केले आहे.विजयानंतर आनंद व्यक्त करताना बोडके म्हणाले, की पक्षाच्या नेत्यांनी एका सामान्य कार्यकर्त्याला काम करण्याची संधी दिली आहे. त्याचे सोने करण्याचा पूर्ण प्रयत्न करेन. शहरातील कचरासमस्या सोडवून शहर कचरामुक्त करण्यावर माझा भर राहील. त्याचबरोबर स्मार्ट सिटी योजना, २४ तास पाणीपुरवठा योजना यांना गती देण्यासाठी प्रयत्न करेन. मला सहकार्य करणाऱ्या सर्वच पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचे मी आभार मानतो. बोडके यांच्या रूपाने एक चांगला अध्यक्ष स्थायी समितीला लाभला असून, महापालिकेतील एक शिपाई आज पालिकेच्या तिजोरीचा चालक झाला आहे, अशा शब्दामध्ये आमदार अनिल भोसले यांनी बोडके यांचा गौरव केला.