शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

एकत्रित निवडणुका घेण्यावर राष्ट्रपतींचाही भर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2018 06:54 IST

सतत देशाच्या कोणत्या ना कोणत्या भागात होत राहणा-या निवडणुका आणि त्यामुळे वाढणार खर्च पाहता लोकसभा व विधानसभा यांच्या निवडणुका एकत्र घेण्यासाठी सहमतीचे वातावरण तयार व्हावे, अशी अपेक्षा राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी संसदेतील आपल्या पहिल्याच अभिभाषणात व्यक्त केली.

-हरिश गुप्तानवी दिल्ली : सतत देशाच्या कोणत्या ना कोणत्या भागात होत राहणा-या निवडणुका आणि त्यामुळे वाढणार खर्च पाहता लोकसभा व विधानसभा यांच्या निवडणुका एकत्र घेण्यासाठी सहमतीचे वातावरण तयार व्हावे, अशी अपेक्षा राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी संसदेतील आपल्या पहिल्याच अभिभाषणात व्यक्त केली. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही एकत्रित निवडणुकांबद्दल सकारात्मकता दर्शविली होती.अर्थसंकल्पीय अधिवेशनात दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीसमोर राष्ट्रपती कोविंद ट्रिपल तलाकचाही मुद्दा उपस्थित केला. ट्रिपल तलाकवरील बंदीमुळे मुस्लीम महिला व मुली यांना आत्मसन्मान आणि धार्ष्ट्य प्राप्त होईल. ट्रिपल तलाक हे विधेयक म्हणजे महिलांसाठी प्रगतीच्या दिशेने महत्त्वाचे पाऊ लच असेल, असा दावा त्यांनी केला. आपल्या ४५ मिनिटांच्या भाषणात अंतर्गत सुरक्षेवर भर देताना राष्ट्रपतींनी सुरक्षा दले ईशान्य भारतातील राज्ये व जम्मू-काश्मीरमध्ये तसेच नक्षलग्रस्त राज्यांत उत्तम काम करीत असल्याचा निर्वाळा दिला. मोदी सरकारच्या नवभारत योजनेतील जवळपास सर्व योजनांचा उल्लेख त्यांनी केला. या योजना एखाद्या राजकीय पक्षाचा अजेंडा नसून, देशातील १३0 कोटी जनतेच्या विकासाचा तो अजेंडा आहे, असेही ते म्हणाले. स्टार्ट अप इंडिया, स्टँड अप इंडिया याचा फायदा देशातील तरुणांना मिळू लागला असून, सरकारने आता २४00 ‘अटल टिंकरिंग लॅब्ज’ सुरू करण्याचे ठरविले आहे. त्यामुळे तरुण व मुले यांच्या नवनवीन कल्पनांना उडण्याचे पंखच मिळतील, असे राष्ट्रपती म्हणाले.भ्रष्टाचाराला बसला आळाउज्ज्वला योजनेमार्फत सव्वातीन कोटीहून अधिक कुटुंबांना गॅसजोडणी, बेटी बचाओ, सौभाग्य योजनेद्वारे घराघरांत वीज, गरोदर महिलांना मातृत्वाची २६ आठवडे रजा, जनधन योजनेमुळे लोकांच्या खात्यात विविध योजनांचे पैसे थेटजात असल्याने भ्रष्टाचार व गैरकारभाराला बसलेला आळा, किसान संपदा योजना, दुग्धप्रक्रिया सोयींसाठी ११ हजार कोटींचा विकास निधी या साºयांचा राष्ट्रपतींनी उल्लेख केला.देशातील उच्च शिक्षणावर अधिक भर देण्याचे केंद्र सरकारने ठरविले आहे. डिजिटल व्यवहारामुळे केंद्राच्या ४00 योजनांचा थेट आर्थिक लाभ लोकांना मिळत असल्याचे राष्टÑपती म्हणाले.

टॅग्स :Ramnath Kovindरामनाथ कोविंदParliamentसंसद