शहरं
Join us  
Trending Stories
1
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
2
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
3
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
4
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
5
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
6
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
7
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
8
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
9
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
10
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा
11
Phaltan Doctor Death: पंढरपुरातून पळाला, बीडमध्ये गेला अन्...; 48 तासात PSI गोपाळ बदने कुठे कुठे लपला?
12
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर 'निवृत्ती'? 'सिडनीला शेवटचा निरोप...'! भारतात  परतण्यापूर्वीच रोहित शर्माची भावनिक पोस्ट
13
"सत्तेत आलो तर आम्ही वक्फ कायदा कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ..."; तेजस्वी यादव यांचे जाहीर सभेत आश्वासन
14
नशेमुळे झाला कुर्नूल बस अपघात; चूक कुणाची? बाइकस्वारांची की बस ड्रायव्हरची? खुद्द डीआयजींनीच केला खुलासा
15
पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल, अंत्यसंस्कारही झाले, चूक कोणाची? समोर आली धक्कादायक माहिती
16
'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो'; फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना जाहीर सभेत स्पष्टच सांगितले
17
आंध्र प्रदेशातील बस अपघातातील चालकाला अटक, आग लागल्यानंतर प्रवाशांना सोडून पळून गेला होता
18
पॅरिसमधील संग्रहालयात ‘धूम’स्टाईल चोरी, मौल्यवान रत्ने लांबवली, अखेर असे सापडले चोर  
19
"मी दर महिन्याला एक युद्ध थांबवतो; आता पाकिस्तान-अफगाणिस्तान...," डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
20
‘मद्यपान करून गाडी चालवणारे दहशतवादीच’, कुरनूल बस अपघातानंतर हैदराबादच्या पोलीस आयुक्तांचं परखड विधान

वर्तमानात जगा - उद्धव

By admin | Updated: June 19, 2016 03:29 IST

मराठी माणसाच्या मनात आग पेटविण्याचे काम शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केले. कारण शिवसेना हा नुसता पक्ष नाही. तर मराठी माणसाच्या मनातील आग आहे. त्यामुळे उद्या

मुंबई : मराठी माणसाच्या मनात आग पेटविण्याचे काम शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केले. कारण शिवसेना हा नुसता पक्ष नाही. तर मराठी माणसाच्या मनातील आग आहे. त्यामुळे उद्या काय होणार? याचा विचार करु नका. भुतकाळात रमु नका. वर्तमानात जगा आणि संकटाच्या छाताडावर नाचत पुढे जाण्याचा आत्मविश्वास ठेवा. तो असेल तर शिवसेनाच काय, मराठी माणुस आणि महाराष्ट्राचे कुणीही काहीही वाकडे करु शकणार नाही, असे प्रतिपादन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले.डॉ. विजय ढवळे यांच्या ‘वाघाचे पंजे’ या पुस्तकाचे प्रकाशन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते अंधेरी येथील हॉटेल कोहिनूर कॉन्टिनेटलमध्ये शनिवारी करण्यात आले; यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी उद्योगमंत्री सुभाष देसाई, खासदार संजय राऊत, ज्येष्ठ नेते मनोहर जोशी, लिलाधर डाके, अर्थराज्यमंत्री दीपक केसरकर, महापौर स्नेहल आंबेकर, नवचैतन्य प्रकाशनचे शरद मराठे आदी मान्यवर उपस्थित होते.उद्धव ठाकरे म्हणाले की, शिवसेनेला पन्नास वर्ष पूर्ण होत आहेत, असे वाटत नाही. सर्व गोष्टी कालपरवा घडल्यासारखे वाटते. पन्नास वर्षांपूर्वी प्रबोधनकार ठाकरे यांनी शिवसेनाप्रमुखांना बोलावले आणि काही संघटना किंवा पक्ष काढण्याचा विचार आहे की नाही? असा सवालही केला. त्यानंतर तात्काळ शिवसेना या नावाने संघटना काढण्याचे सूचवत शिवसेना स्थापनेचा नारळ घरातच फोडला. या घटनेचा मी साक्षीदार आहे.विजय ढवळे म्हणाले की, शिवसेना हा माझा ध्यास आणि श्वास आहे. त्यामुळेच हे पुस्तक मी लिहू शकलो. शिवसेनेच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त योगदान देण्याची इच्छा होती. त्यासाठी मी १ हजार २०० तास दिले आणि पुस्तकाच्या निमित्ताने कॅनडातून मुंबईत आलो.हे पुस्तक लिहिताना झपाटुन गेलो होतो. ते मंतरलेले दिवस होते. ते दिवस मी पुन्हा जगलो. कॅनडात जाण्याआधी शिवसेनाप्रमुखांनी मला मोठा हो; पण शिवसेनेला विसरू नको, असे सांगितले होते. हा आदेश मी तंतोतंत पाळला. (प्रतिनिधी)‘वाघाचे पंजे’ स्पॅनिशमध्येही येणार...शिवसेनाप्रमुखांचे फटकारे आणि वाघाचे पंजे या पुस्तकांमध्ये साम्य आहे. वाघाचे पंजे हे वाघाचे शस्त्र असतात. त्यामुळे कोणी सहसा वाघाच्या वाटेला जात नाही. जर गेला तर एका पंजात तो सपाट होतो. हे पुस्तक जगातील दुसऱ्या क्रमांकाची भाषा असलेल्या स्पॅनिश भाषेतही येणार आहे. शिवसेनेत राहून प्रत्यक्ष अनुभव घेतलेल्या शिवसैनिकाने लिहिलेले हे पुस्तक सर्वात वेगळे आहे. शिवसेनेवर बहुतेक पुस्तके आली. पण शिवसेनेत राहून आणि प्रत्यक्ष अनुभव घेतलेल्या शिवसैनिकाने लिहिलेले हे पुस्तक वेगळे असल्याचे उद्धव ठाकरे यांनी या वेळी सांगितले.