शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ आंदोलनकर्त्या नेत्यांची नावे सादर करा

By admin | Updated: February 23, 2017 04:07 IST

उच्च न्यायालयलयाच्या आदेशावरून दिघ्यातील इमारती सील करण्यासाठी गेलेल्या सरकारी अधिकाऱ्यांना राजकीय

मुंबई : उच्च न्यायालयलयाच्या आदेशावरून दिघ्यातील इमारती सील करण्यासाठी गेलेल्या सरकारी अधिकाऱ्यांना राजकीय नेत्यांच्या नेतृत्वाखाली आंदोलने करून अडवण्याचा प्रयत्न झाल्याच्या पार्श्वभूमीवर आंदोलनासाठी चिथावणाऱ्या सर्व राजकीय नेत्यांची नावे सादर करण्याचे निर्देश बुधवारी उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले.दिघ्यातील बेकायदेशीर बांधकामांविरुद्ध राजीव मिश्रा व अन्य एकाने उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. बेकायदा बांधकामांवर तसेच त्यांना परवानगी देणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केली आहे.या याचिकेवरील सुनावणी न्या. अभय ओक व न्या. अनुजा प्रभुदेसाई यांच्या खंडपीठापुढे होती. न्यायालयाच्या आदेशानुसार बेकायदा इमारत सील करण्यासाठी गेलेल्या सरकारी अधिकाऱ्यांविरुद्ध आंदोलन करण्यात आल्याची माहिती बुधवारच्या सुनावणीत खंडपीठाला दिली.त्यावर खंडपीठाने संताप व्यक्त केला. न्यायालयाच्या आदेशावरून अधिकारी कारवाई करण्यासाठी गेले होते. त्यांच्याविरुद्ध आंदोलन करण्यासाठी नागरिकांना कोणी चिथावले ? राजकीय नेत्यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आल्याने त्यांची नावे पुढील सुनावणीस सादर करण्याचे निर्देश खंडपीठाने राज्य सरकारला दिले. (प्रतिनिधी)अतिक्रमणाचा विळखानियोजित आणि सर्व सुविधायुक्त असे शहर असावे, या हेतूने नवी मुंबईची निर्मिती करण्यात आली. त्यासाठी राज्य सरकारने कोट्यवधी रुपये खर्चून भूखंड संपादित केले. मात्र याही शहराला अतिक्रमणाचा विळखा बसला आहे. ही बेकायदा बांधकामेही नियमित करणार का? असा प्रश्न उच्च न्यायालयाने सरकारला केला. त्यावर सरकारी वकिलांनी, बांधकाम नियमित करण्यापूर्वी शहर नियोजन प्राधिकरण ‘ना-हरकत’ प्रमाणपत्र देईल आणि त्यानुसार बांधकाम नियमित केले जाईल, अशी माहिती खंडपीठाला दिली.एवढा मोठा निर्णय आम्हाला शहर नियोजन प्राधिकरणावर सोडायचा नाही. याबाबत राज्य सरकारनेच भूमिका स्पष्ट करावी. राज्य सरकारने एकादा का हे धोरण लागू केले तर ते संपूर्ण राज्यासाठी लागू होईल. त्यामुळे राज्य सरकारने त्यांची भूमिका स्पष्ट करावी, असे खंडपीठाने म्हटले.