शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
2
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
3
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
4
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल
5
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
6
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
7
पश्चिम बंगालमध्ये ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, ३० जण जखमी
8
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS
9
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
10
बाबो! क्रिती सनॉनने मुंबईत खरेदी केलं पेंटहाऊस, किंमत ऐकून पायाखालची जमीनच सरकेल
11
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
12
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
13
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
14
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
15
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
16
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
17
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
18
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
19
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
20
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना

सध्या बोलायचीही भीती वाटते

By admin | Updated: March 9, 2016 06:07 IST

‘सध्या देशात असुरक्षितेचे वातावरण वाढत असून, या पार्श्वभूमीवर साधे काही बोलायचे म्हटले, तर आपल्याला देशद्रोही ठरवतील अशी भीती वाटते,’ अशी खंत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते

पुणे: ‘सध्या देशात असुरक्षितेचे वातावरण वाढत असून, या पार्श्वभूमीवर साधे काही बोलायचे म्हटले, तर आपल्याला देशद्रोही ठरवतील अशी भीती वाटते,’ अशी खंत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव यांनी येथे व्यक्त केली.मुस्लीम सत्यशोधक मंडळ व मुस्लीम सत्यशोधक महिला मंच यांच्या वतीने मुस्लीम महिलांच्या अधिकारासंदर्भात पुणे स्टेशन येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे आंदोलन करण्यात आले. या वेळी आयोजित सभेत ते बोलत होते. मोर्चासाठी मंडळाचे अध्यक्ष प्रा. शमसुद्दीन तांबोळी, मंचच्या प्रमुख तमन्ना शेख-इनामदार, डॉ. बेनझीर तांबोळी, हमीद दलवाई स्टडी सर्कलच्या जरीना मेहबूब तांबोळी आदी उपस्थित होते. आढाव म्हणाले की, ‘चौकशीच्या नावाखाली पोलीस कधीही मुस्लीम तरुणांना उचलून नेतात, यामुळे या तरुणांमध्ये भीतीचे वातावरण आहे, तसेच अन्य समाजातील स्त्रियांप्रमाणेच मुस्लीम स्त्रियादेखील स्वत:च्या हक्कासाठी पुढे येत आहेत. केंद्र व राज्य सरकारने एकत्र येऊन समान नागरी कायदा केला पाहिजे,’ असे सांगून प्रा. तांबोळी यांनी सच्चर समिती, रंगनाथ मिश्रा आयोगाच्या शिफारशी सरकारने त्वरित लागू कराव्यात. या शिवाय तोंडी तलाक, बहुपत्नीत्वसारख्या प्रथा बंद करण्याला सरकारने प्राधान्य द्यावे, असे सांगितले. आंदोलनामध्ये सहभागी महिलांनी कालबाह्य प्रथांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. (प्रतिनिधी)रुक्साना शेख : मुस्लीम धर्मीयांमध्ये बहुपत्नीत्व किंवा तोंडी तलाकसारखे कायदे कित्येक वर्षांपासून सुरू आहेत. हे कायदे स्त्रियांवर लादून त्यांचे शोषण करण्याचा प्रयत्न होत आहे. मुस्लीम स्त्रियांच्या हक्कांवर गदा आणणाऱ्या प्रथा बंद झाल्या पाहिजेत. बदलत्या काळानुसार महिलांनीही या अन्याय-अत्याचाराविरुद्ध आवाज उठविण्याची गरज आहे.तोंडी तलाक, बहुपत्नीत्व या प्रथा बंद करण्यासाठी कायदा करावा, जिल्हा पातळीवर कौटुंबिक न्यायालये, समान नागरी कायद्यासाठी समिती नेमावी, मुस्लीम महिलांसह सर्वच महिलांवरील अन्याय-अत्याचार थांबविण्यासाठी कायदा करावा, सच्चर समिती, न्या. रंगनाथ मिश्रा आयोग, डॉ. मेहमूद उर रेहमान अभ्यास गटाच्या शिफारशी अंमलात आणण्यासाठी धोरण आखावे, या मागण्यांचे निवेदन राज्य सरकारकडे पाठविण्यात आले आहे.