शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

बुलेट ट्रेन बैठकीला तिनशे भूमिपुत्रांची उपस्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2017 03:50 IST

बुलेट ट्रेन संदर्भात चर्चा, माहिती आणि विचारविनिमय करण्यासाठी सोमावारी सकाळी ११ वाजता मान ग्रामपंचायत कार्यालयात आयोजिलेल्या बैठकीला ३०० भूमिपुत्रांची उपस्थिती होती

पंकज राऊत । लोकमत न्यूज नेटवर्कबोईसर : मुंबई-अहमदाबाद दरम्यानच्या प्रस्तावित बुलेट ट्रेन संदर्भात चर्चा, माहिती आणि विचारविनिमय करण्यासाठी सोमावारी सकाळी ११ वाजता मान ग्रामपंचायत कार्यालयात आयोजिलेल्या बैठकीला ३०० भूमीपुत्रांची उपस्थिती होती. ंहा प्रस्तावित लोहमार्ग पालघर तालुक्यातील कल्हाले, मान, बेटेगाव, पडघे या गावांतून जाणार असून त्याचे फायनल लोकेशन सर्व्हे आणि जिओटेक्निकल इनव्हीस्टीगेशन हे सर्व्हे लवकरच करण्या संदर्भात ही बैठक आयोजिली होती.बैठकीला पालघरचे तहसीलदार महेश सागर आणि पश्चिम रेल्वे चे अधिक्षक अभियंता चंदन सिंह यांच्यासह बोईसरचे मंडळ अधिकारी संदीप म्हात्रे मान ग्रामपंचायतीचे सरपंच मोरेश्वर दौडा, उप सरपंच अ‍ॅड. राहुल पाटील, माजी उप सरपंच जितेंद्र पाटील, तलाठी साधना चौहान, मान, बेटेगाव, आणि पडघा ग्रामपंचायतीचे सदस्य, ग्रामसेवक, पोलीस पाटील आणि स्थानिक नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. जपान सरकरच्या मदतीने हा बुलेट ट्रेनचा महत्वकांक्षी प्रकल्प साकार होणार असून तो पूर्ण करण्याकरीता रेल्वे मंत्रालय भारत सरकार यांच्यावतीने सर्व्हे होणार आहे या रेल्वे मार्गाला साधारणत: १५ मीटर रुंद जागा लागणार असून जमीनीपासून ६ ते १० मीटर उंची वरु न बुलेट ट्रेन धावणार आहे. तर प्रत्येक १०० मीटर अंतरावर पिलर उभारण्यात येणार आहेत, अशी माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी आणि तहसीलदारांनी देऊन सर्व्हेला सहकार्य करण्याची विनंती केली. तर या बुलेट ट्रेनमुळे मुंबई अहमदाबाद या दोन्ही शहरा मधील अंतर कमी होणार आहे.>प्रवास कालावधी ३ ताससध्या या प्रवासाला आठ तास लागतात मात्र ही बुलेट ट्रेन साकार झाल्यावर याच प्रवासासाठी फक्त तीन तास लागणार आहेत. ताशी जास्तीत जास्त ३५० कि.मी. वेगाने ही ट्रेन धावणार आहे. हा प्रकल्प यशस्वी झाल्यावर अशीच ट्रेन भारतातील प्रमुख शहराच्या दरम्यान सुरू करणारे प्रकल्प हाती घेतले जाणार असल्याने तो महत्वाचा आहे.