शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ लग्नास पोलिसांची उपस्थिती गैरलागू नाही

By admin | Updated: June 2, 2017 03:27 IST

मुस्लीम समाजाचे धर्मगुरू शहर-ए-खतिब हिसामोद्दीन यांच्या पुतण्याच्या लग्न सोहळ्यास पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची उपस्थिती ही केवळ

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : मुस्लीम समाजाचे धर्मगुरू शहर-ए-खतिब हिसामोद्दीन यांच्या पुतण्याच्या लग्न सोहळ्यास पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची उपस्थिती ही केवळ सार्वजनिक संपर्काचा भाग होती. कुख्यात गुन्हेगार दाऊद इब्राहिम अथवा त्याच्या नातलगाशी त्यांचा कोणत्याही स्वरूपाचा वैयक्तिक संबंध आढळून आलेला नाही, असा निष्कर्ष चौकशी अधिकाऱ्यांनी काढला आहे.नाशिक शहरातील भद्रकाली परिसरात राहाणारे हिसामोद्दीन खतिब यांचे पुतणे शाकीर रजा यांचा विवाह जकी उस्मान कोकणी यांची मुलगी झोया हिच्याशी १९ मे रोजी झाला. या लग्न सोहळ्यास राजकीय नेते, शहरातील व्यापारी, व्यावसायिक व पोलिस अधिकाऱ्यांनी हजेरी लावली होती.मात्र, जकी उस्मानची पत्नी आणि कुख्यात गुन्हेगार दाऊदचा भाऊ इकबाल कासकरची पत्नी दोघी बहिणी आहेत. त्यामुळे दाऊदच्या नातेवाईकाचे लग्न असताना त्यास पोलिस अधिकाऱ्यांची उपस्थिती कशी? असा सवाल उपस्थित करत संशय व्यक्त करण्यात आला होता. याबाबतचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर पोलिस आयुक्त डॉ. रविंद्रकुमार सिंघल यांनी चौकशीचे आदेश दिले होते.या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करून पोलिस उपाआयुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी आपला अहवाल सादर केला आहे. शहरातील कायदा व सुव्यवस्थेच्या कामी हिसामोद्दीन खतिब यांचे नेहमीच सहकार्य असते. शिवाय, ते शांतता कमिटीचे सदस्य आहेत. केवळ या सार्वजनिक संपर्कातूनच पोलिस अधिकारी व कर्मचारी या लग्न समारंभास उपस्थित राहिले. खतिब यांच्या पुतण्याचे लग्न नेमके कोणाशी आहे, याबाबत ते अनभिज्ञ होते. दाऊदच्या नातलगाशी हे लग्न असल्याचे समजले असते, तर कदाचित पोलिसांनी या विवाह समारंभास जाण्याचे टाळले असते, असे उपायुक्त पाटील यांनी आपल्या चौकशी अहवालात म्हटले आहे.लग्नसोहळ्यास हजेरी लावलेल्या पोलिसांची दाऊद अथवा त्याचा नातलग जकी उस्मानशी कोणत्याही स्वरूपाचे वैयक्तिक संबंध आढळून आले नाहीत, असा निष्कर्षही चौकशी अहवालात काढण्यात आला आहे. शिवाय, नाशिक शहरात कोकणी मुस्लीमांचे सर्वच क्षेत्रात प्राबल्य आहे. त्यामुळे गैर कोकणी (दखनी मुस्लीम) यांच्यात नेहमीच वाद होत असतात. यातूनच लग्नाच्या अनुषंगाने सोशल मीडियातून पोलिसांची बदनामी करण्यात येत असल्याचे चौकशी अहवालात म्हटले आहे. ही चौकशी केवळ पोलिसांशी संबंधित असल्याने लग्नास उपस्थित राहिलेल्या राजकीय व्यक्तींचा उल्लेख करण्यात आलेला नाही.