शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

मध्यावधी निवडणूक लागल्यास स्वबळाची तयारी ठेवा कामाला लागा

By admin | Updated: April 26, 2017 22:47 IST

मध्यावधी निवडणूक लागल्यास स्वबळाची तयारी ठेवा कामाला लागा, अशाही सूचना पदाधिकाऱ्यांना दिल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले

ऑनलाइन लोकमतपिंपरी, दि. 26 -  भारतीय जनता पक्षाच्या राज्य कार्यकारिणीची बैठक बुधवारी पिंपरी झाली. त्यास निवडक ६८ सदस्य उपस्थित होते. यावेळी भाजपाला मिळालेले अभूतपूर्व यश, शेतकरी आत्महत्या, शिवसेनेची टीका, मध्यवधी निवडणूक, सरकारची धोरणे यावर चर्चा करण्यात आली.  मध्यावधी निवडणूक लागल्यास स्वबळाची तयारी ठेवा कामाला लागा, अशाही सूचना पदाधिकाऱ्यांना दिल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.पिंपरीतील पंचतारांकित हॉटेल कलासागर येथे सकाळी सुरूवातीला भाजपातील केवळ ६८ पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याहस निवडक पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीबाबत कमालीची गुप्तता पाळली होती. यावेळी महाराष्ट्रातील महापालिका, जिल्हा परिषद निवडणूकींमधील यशाबद्दल चर्चा झाली. यावेळी भाजपाच्या ध्येयधोरणावर चर्चा, तसेच पुढील कामकाजाचे नियोजन यावर चर्चा झाली. राज्यातील शिवसेनेने पाठींबा काढून घेतल्यास मध्यावधी निवडणूक लागल्यास भूमिका काय असेल? यावर चर्चा झाली. सत्तेत असूनही शिवसेना भाजपावर टीका करते. त्यांना सडेतोड उत्तर दिले पाहिजे. याबाबत आक्रमक भूमिका घ्यायला हवी. विरोधकांना अंगावर येऊ देऊ नका? त्यावेळी काहींनी देशात आणि राज्यात पक्षाला चांगले यश मिळाले आहे. त्यामुळे स्वबळाची तयारी करावी. स्वबळावर निवडणूक लढवावी, अशीही चर्चा झाली. त्यावर यावर पक्षातील ज्येष्ठांशी चर्चा केली जाईल. कार्यकर्त्यांच्या भावनाचा आदर करू, मध्यावधी निवडणूक लागल्यास आपण तयारीत रहायला हवे, असेही वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी पश्न विचारणाऱ्या सदस्यांना सांगितले. सरकारच्या चांगल्या योजना जनतेपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करा? अशाही सूचना करण्यात आल्या. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी थेट गावागावातील शेतकऱ्यांशी बांधावर जाऊन चर्चा केली पाहिजे. प्रश्न जाणून घ्यायला हवेत. सरकारची शेतीविषयक धोरण कशी चांगली आहेत, याचीही माहिती दिली पाहिजे, असेही पदाधिकाऱ्यांना सूचित करण्यात आले.