शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

साक्षीदार संरक्षण कायद्याचा मसुदा तयार

By admin | Updated: November 17, 2015 02:16 IST

एखाद्या खटल्यातील आरोपीला फाशीची किंवा जन्मठेपेची शिक्षा होण्याची शक्यता असेल तर त्या खटल्यातील साक्षीदारांना संरक्षण देण्याच्या कायद्याचा कच्चा मसुदा तयार असल्याची

मुंबई : एखाद्या खटल्यातील आरोपीला फाशीची किंवा जन्मठेपेची शिक्षा होण्याची शक्यता असेल तर त्या खटल्यातील साक्षीदारांना संरक्षण देण्याच्या कायद्याचा कच्चा मसुदा तयार असल्याची माहिती सोमवारी राज्य सरकारने उच्च न्यायालयाला दिली. मात्र या कायद्याच्या कक्षेत अद्याप सामाजिक व आरटीआय कार्यकर्त्यांचा समावेश करण्यात आलेला नाही.काही खटल्यांमध्ये धमक्यांमुळे साक्षीदार खटल्यादरम्यान ‘फितुर’ होतात किंवा फरार होतात. याचा फायदा आरोपीला होतो. याची दखल घेत उच्च न्यायालयाने ‘स्यु-मोटो’ दाखल करून घेतली. न्या. अभय ओक व न्या. गौतम पटेल यांच्या खंडपीठापुढे या याचिकेवर सुनावणी होती. सुनावणीवेळी सहायक सरकारी वकील नितीन देशपांडे यांनी साक्षीदारांना संरक्षण देण्यासंदर्भात कायद्याचा कच्चा मसुदा तयार केला आहे. त्यावर हरकती व सूचना मागवण्यात येतील, अशी माहिती खंडपीठाला दिली.प्रस्तावित कायद्यानुसार, संरक्षण मिळवण्यासाठी सरकारी वकील, तपासाधिकारी किंवा खुद्द साक्षीदाराला समितीकडे अर्ज करावा लागेल. त्यानुसार त्याला अंतरिम संरक्षण देण्यात येईल. त्यानंतर साक्षीदार ज्या ठिकाणी राहात आहे, त्या ठिकाणाचा वरिष्ठ पोलीस अधिकारी साक्षीदाराच्या जिवाला धोका आहे की नाही, याची छाननी करून त्यासंबंधीचा अहवाल समितीला देईल आणि मगच ती समिती साक्षीदाराला कशा स्वरूपाचे संरक्षण द्यायचे, यावर निर्णय घेईल.कच्चा मसुदा खुद्द अ‍ॅड. नितीन देशपांडेंनी तयार केला आहे. त्यानुसार, साक्षीदाराला भूमिगत करण्याची आवश्यकता भासल्यास तसेही करण्यात येईल, असे म्हटले आहे.‘स्यु-मोटो’ दाखल खटल्यादरम्यान जर एखाद्या साक्षीदाराबरोबर घातपात झाला तर त्याच्या कुुटुंबीयांना नुकसानभरपाई देण्यात येईल, असे मसुद्यात नमूद करण्यात आले आहे. या कायद्यात सामाजिक आणि आरटीआय कार्यकर्त्यांचाही समावेश करण्यात येईल, असे अ‍ॅड. देशपांडे यांनी सांगितले.त्यावर खंडपीठाने प्रस्तावित कायद्याचा कच्चा मसुदा ‘न्यायालयीन मित्र’ म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या अ‍ॅड. मदान यांना देण्याचे निर्देश सरकारी वकिलांना दिले. तसेच अ‍ॅड. मदान यांनी २१ डिसेंबरपर्यंत मत नोंदविण्याचे निर्देश दिले.