शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

वसना, माणगंगासाठी आराखडा तयार

By admin | Updated: May 25, 2015 00:32 IST

मुख्यमंत्री : कायम दुष्काळी भाग ‘बागायती’ करणार

सातारा : जिल्ह्यातील वसना आणि माणगंगा या दोन नद्यांच्या पुनरुज्जीवनासाठी आराखडा तयार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. ही योजना तसेच जिहे-कटापूर योजना पूर्ण करण्याचा विडा राज्य शासनाने उचलला असून, कायम दुष्काळी भाग ‘बागायती’ म्हणून नावारूपाला आणण्याचा आमचा संकल्प आहे, असे त्यांनी सांगितले.वसना आणि माणगंगा नद्यांच्या पुनरुज्जीवनासाठी अनुक्रमे १३ आणि १७ नवीन बंधाऱ्यांचा प्रस्ताव असून, या नद्यांवरील कोल्हापूर पद्धतीचे सर्व बंधारे दुरुस्त करण्यात येणार आहेत, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. ‘मोठ्या सिंचन योजनांऐवजी स्थानिक पातळीवर छोटे जलसाठे तयार करण्याचा पर्याय शासनाने निवडला असून, जिल्ह्यात जलयुक्त शिवार ही लोकचळवळ होताना दिसते आहे. मोहिमेतील सर्व योजना सुरू होण्यापूर्वी, काम सुरू असताना आणि नंतर अशी तीन छायाचित्रे उपग्रहावरून घेतली जाणार आहेत. तसेच त्रयस्थ संस्थेकडून कामांचे मूल्यमापन करण्यात येणार असल्यामुळे भ्रष्टाचाराचा प्रश्नच उद््भवणार नाही,’ असे फडणवीस यांनी सांगितले. ‘जलयुक्त शिवार’च्या जिल्ह्यातील टीमने उत्कृष्ट काम केले असून, टंचाईमुक्तीचा शाश्वत मार्ग दृष्टिपथात आला असल्याचे ते म्हणाले. जिल्हा रुग्णालयाच्या दुरवस्थेसंदर्भात विचारले असता, त्यासंदर्भात आरोग्यमंत्र्यांशी चर्चा करून सर्व अडचणी दूर करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. (प्रतिनिधी)‘लवासा’ला जमीन; कॉलेजला का नाही?कृष्णा खोरे विकास महामंडळाची जमीन ‘लवासा’ला दिली गेली; पण सातारच्या वैद्यकशास्त्र महाविद्यालयाला जमीन देताना अनेक अटी महामंडळाने घातल्या. महाविद्यालयाच्या उभारणीतील हा प्रमुख अडथळा दूर करून आम्ही तातडीने जमीन मिळवू आणि काम सुरू करू, असे आश्वासन फडणवीस यांनी दिले.‘जिहे-कटापूर’ पूर्ण करणारचदुष्काळी भागाचे चित्र पालटण्याची ताकद असणारा जिहे-कटापूर प्रकल्प पूर्ण करणे राज्यपालांच्या अखत्यारीत येत असले, तरी खास बाब म्हणून हा प्रकल्प राज्यपालांच्या कार्यक्षेत्रातून बाहेर आणण्यासाठी त्यांना विश्वासात घेणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. हा प्रकल्प तातडीने मार्गी लावण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू करण्यात आले असून, निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, असे ते म्हणाले.