शहरं
Join us  
Trending Stories
1
विकणाऱ्याला अटक, मग विकत घेणाऱ्याला का नाही?, अंबादास दानवेंचा पार्थ पवारांना अडचणीत आणणारा सवाल
2
पश्चिम बंगालमध्ये बाबरी बांधण्याची घोषणा केलेली; ममता बॅनर्जींनी आमदाराला पक्षातून निलंबित केले
3
२८ वर्ष जुन्या मित्राला सोबत घेण्यासाठी भाजपाच्या हालचाली?; पुन्हा समीकरणे जुळवण्याची तयारी
4
OnePlus Ace 6T: 'इतकी' मोठी बॅटरी...! वनप्लसनं बाजारात आणलाय दीर्घकाळ टिकणारा फोन, किंमत किती?
5
"...तर शिवसैनिक तुम्हाला पळवून लावतील"; शिंदेसेनेचा भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांना इशारा
6
Dhule Crime: मौजमज्जा करण्यासाठी बी. टेकच्या विद्यार्थ्याने मित्रांच्या मदतीने स्वतःच्याच घरावर टाकला दरोडा; १० तोळे सोने चोरले
7
VIDEO: बाबाजी का ठुल्लू... विराट कोहलीचे मजेशीर हावभाव, विकेट पडताच मैदानात धमाल-मस्ती
8
सडकून ताप, अंगदुखी अन् अचानक मृत्यू! जंगलात राहणाऱ्या 'या' किड्याने घातला राज्यभरात धुमाकूळ
9
'सेन्यार'चा कहर थांबेना; थायलंड, मलेशिया, इंडोनेशिया अन् श्रीलंका पूरामुळे बेजार! १४००हून अधिक लोकांचा मृत्यू 
10
महापालिका निवडणुकीच्या तयारीला झाली सुरुवात, नागपूर आणि चंद्रपूरसाठी नव्याने आरक्षण सोडत
11
भयंकर! "माझ्यापेक्षा सुंदर कोणीच असू नये"; ४ लहान मुलांना मारणाऱ्या सायको किलरचा पर्दाफाश
12
१० वर्षात १ कोटींच्या निधीचं स्वप्न पूर्ण करायचंय? जाणून घ्या दर महिन्याला किती करावी लागेल SIP
13
गोंदियात EVM चं सील तोडल्याचा आरोप तर सांगलीत रातोरात मतदान वाढल्याचा दावा; स्टाँगरूमबाहेर राडा
14
Sheetal Tejwani: पुणे पोलिसांनी अटक केलेली शीतल तेजवानी कोण? पार्थ पवारांच्या कंपनीसोबत केला होता जमिनीचा व्यवहार
15
इंडिगोची 'साडेसाती' संपेना... आज एकाच दिवशी तब्बल १००हून जास्त उड्डाणे रद्द, गोंधळ सुरूच
16
Sunny Leone : 'बेबी डॉल' झळकली शेतात; सनी लिओनीचे फोटो शेतकऱ्यांनी चक्क बांधावर लावले, कारण...
17
प्रणित मोरे 'बिग बॉस १९'चा विजेता? फिनालेआधीच हातात ट्रॉफी घेतलेला फोटो होतोय व्हायरल
18
कोण आहे 'ती' इराणी मुलगी; जिच्यावर अमेरिकेनं लावलंय हाफिज सईद इतकं इनाम!
19
'Bata' हा भारतीय फुटवेअर ब्रँड आहे का? अनेक जण करतात ही चूक; पाहा कोणते ब्रँड्स आहेत स्वदेशी आणि कोणते विदेशी?
20
नागपूर हिवाळी अधिवेशन सात दिवसांचेच शनिवार, रविवारी कामकाज; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे सावट
Daily Top 2Weekly Top 5

महापालिका निवडणुकीच्या तयारीला झाली सुरुवात, नागपूर आणि चंद्रपूरसाठी नव्याने आरक्षण सोडत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2025 12:12 IST

राज्य निवडणूक आयोगाने पालिका निवडणुकीसाठी मतदार याद्यांच्या संदर्भात  सुधारित कार्यक्रम जाहीर केला होता.  त्यानुसार प्रसिद्ध झालेल्या  प्रारूप मतदार यादीवर हरकती आणि सूचना देण्याची मुदत बुधवारी संपली.

मुंबई : राज्यातील २२६ नगरपालिका आणि ३८ नगरपंचायतींच्या निवडणुकीचा पहिला टप्पा पार पडल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने आता महापालिका निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. त्या अनुषंगाने मुंबईसह २९ महापालिका आयुक्तांची बैठक गुरुवारी बोलवली आहे. या बैठकीत प्रारूप मतदार याद्या आणि निवडणूक तयारीबाबत आढावा घेतला जाणार आहे. महापालिका आयुक्तांची निवडणुकीची तयारी लक्षात घेऊन आयोग निवडणूक कार्यक्रम तयार करणार आहे.

राज्य निवडणूक आयोगाने पालिका निवडणुकीसाठी मतदार याद्यांच्या संदर्भात  सुधारित कार्यक्रम जाहीर केला होता.  त्यानुसार प्रसिद्ध झालेल्या  प्रारूप मतदार यादीवर हरकती आणि सूचना देण्याची मुदत बुधवारी संपली. दाखल हरकतीवर निर्णय घेऊन प्रभागनिहाय अंतिम मतदार याद्या अधिप्रमाणित करून प्रसिद्ध करण्याची तारीख  १० डिसेंबर आहे, तर २२ डिसेंबर रोजी मतदान केंद्रनिहाय मतदार याद्या प्रसिद्ध होतील.

मतदार यादी दुरुस्त करण्यास महापालिकांनी वेळ वाढवून देण्याची मागणी केल्यास आणखी दोन ते तीन दिवस वाढवून देण्याची तयारी आयोगाने ठेवली आहे. त्यामुळे महापालिका आयुक्तांकडून काय माहिती दिली जाते यावर निवडणुकीच्या तारखा आणि कार्यक्रम ठरेल, असे सूत्रांनी सांगितले.

नागपूर आणि चंद्रपूरसाठी नव्याने आरक्षण सोडत

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार नागपूर आणि चंद्रपूर महापालिकेतील राजकीय आरक्षण मर्यादा ५० टक्क्यांवर आणली जाणार आहे. त्यासाठी महिला खुला प्रवर्ग, इतर मागासवर्ग आणि इतर मागासवर्ग महिला या प्रवर्गासाठी नव्याने आरक्षण सोडत काढण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

जि. प. आणि पं. स. निवडणूक लांबणीवर

राज्यातील निवडणूक होऊ घातलेल्या ३२ जिल्हा परिषदांपैकी १७ जिल्हा परिषदांमध्ये आणि ३३६ पैकी ८८ पंचायत समितीमध्ये आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांच्या वर गेली आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीआधी होणाऱ्या जि. प. आणि पं. स. निवडणुका लांबणीवर गेल्या आहेत. न्यायालयाच्या पुढील निकालावर त्या ठरणार आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Municipal Election Prep Begins; Fresh Reservation Draw for Nagpur, Chandrapur

Web Summary : Maharashtra's election commission prepares for municipal polls after completing Nagar Panchayat elections. A meeting with municipal commissioners will review voter lists and election readiness. Nagpur and Chandrapur will have a fresh reservation draw, while Zilla Parishad elections are delayed due to reservation issues.
टॅग्स :Electionनिवडणूक 2024Local Body Electionस्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकMunicipal Electionमहानगरपालिका - नगरपालिका निवडणूकMunicipal Corporationनगर पालिका