शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

सर्व सोडून मुक्ताई चरणी येण्याची तयारी!

By admin | Updated: June 1, 2016 04:39 IST

‘चमत्काराशिवाय नमस्कार नाही, जोपर्यंत मुक्ताई माझ्या पाठिशी आहे, तोपर्यंत चिंता करण्याची गरज नाही. कॅबिनेटची बैठक काय, मंत्रिमंडळ काय आणि मंत्री काय, सर्व सोडून मुक्ताई चरणी येण्याची तयारी आहे

मुक्ताईनगर (जि. जळगाव) : ‘चमत्काराशिवाय नमस्कार नाही, जोपर्यंत मुक्ताई माझ्या पाठिशी आहे, तोपर्यंत चिंता करण्याची गरज नाही. कॅबिनेटची बैठक काय, मंत्रिमंडळ काय आणि मंत्री काय, सर्व सोडून मुक्ताई चरणी येण्याची तयारी आहे,’ असे सांगत ‘घालोनिया भार राहिलो निश्चिंती...!’ असे अनेक अर्थांनी सूचक वक्तव्य महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांनी येथे केले. श्रीक्षेत्र कोथळी (मुक्ताईनगर जि. जळगाव) येथे मंगळवारी संत मुक्ताई अंतर्धान सोहळा व मुक्ताई मंदिर नूतनीकरण व जीर्णोद्धार सोहळ्याच्या कार्यक्रमात ते म्हणाले की, ‘लहानपणापासून पांडुरंगाच्या दिशेने जाणारा हा वारकरी आहे. केले ते जनतेसाठी केले आहे.’‘माझा भार वाहण्यासाठी हे वारकरी बसले आहे. घालोनिया भार राहिलो निश्चिंती...! निरविली संती विठोबाची।’ या तुकाराम महाराजांच्या अभगांच्या ओळी सांगत त्यांनी आपणास कुठलीही चिंता नाही, भीती नाही. अनेक कावळे काव-काव करीत असल्याची टिप्पणी त्यांनी केली. सकाळी १०.३० वा. खडसे मुक्ताईनगरात दाखल झाले. ‘उत्तर महाराष्ट्र विद्यापीठास संत मुक्ताईचे नाव देण्याच्या मागणीबाबत लवकरच मुख्यमंत्र्यांसमोर प्रस्ताव मांडून विद्यापीठ नामकरणाची मागणी करू,’ असेही खडसे म्हणाले़ (वार्ताहर)लाल दिव्याविना आले खडसे हे लालदिवा नसलेल्या अन्य सरकारी वाहनाने मुक्ताईनगरात दाखल झाले. लाल दिव्याच्या वाहनात पाठदुखीचा त्रास होत असल्याने त्यांनी दुसरे वाहन घेतल्याचे सांगण्यात आले. या वाहनाला क्रमांकही नव्हता. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. त्यानंतर जिल्ह्यात अनेक अफवाही पसरल्या. लालदिव्याचे अन्य वाहन मुक्ताईनगरला पाठविण्यासाठी जिल्हा प्रशासनाची धावपळ झाली.