शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

गरीब विद्यार्थ्याची फी स्वत: भरण्याची उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींची तयारी

By admin | Updated: June 26, 2016 04:19 IST

चेंबूरच्या लोकमान्य टिळक हायस्कूलने एका विधवा मोलकरणीच्या मुलाला हप्त्याने फी घेऊन, शिशूवर्गात प्रवेश देण्याचा सहानुभूतीने विचार करावा, अन्यथा या मुलाची फी आपण स्वत: भरू, अशी

मुंबई : चेंबूरच्या लोकमान्य टिळक हायस्कूलने एका विधवा मोलकरणीच्या मुलाला हप्त्याने फी घेऊन, शिशूवर्गात प्रवेश देण्याचा सहानुभूतीने विचार करावा, अन्यथा या मुलाची फी आपण स्वत: भरू, अशी तयारी मुंबई उच्च न्यायालयाचे ज्येष्ठ न्यायाधीश न्या. विद्यासागर कानडे यांनी दर्शविली आहे.रिटा पन्नालाल कनोजिया या विधवेने केलेल्या याचिकेवर न्या. कानडे व न्या. एम. एस. सोनक यांच्या खंडपीठापुढे शुक्रवारी सुनावणी झाली, तेव्हा न्या. कानडे यांनी शाळेच्या वकिलास उद्देशून तोंडी स्वरूपात ही तयारी दर्शविली. पुढील सुनावणी येत्या २७ जून रोजी होईल, तेव्हा शाळेला यावर उत्तर द्यायचे आहे.रिटा कनोजिया लोकमान्य टिळक विद्यालयाच्या जवळच झोपडपट्टीत राहते व मोलकरीण म्हणून काम करते. तिचा पती कपड्यांना इस्त्री करण्याचा व्यवसाय करायचा. त्याचे दोन वर्षांपूर्वी कर्करोगाने निधन झाले. रिटाच्या दोन मुली याच शाळेत इयत्ता तिसरी व चौथीत शिकतात. कार्तिक या चार वर्षांच्या मुलाला शिशूवर्गात प्रवेशासाठी अर्ज केला, तेव्हा शाळेने विकासशुल्क म्हणून १९,५०० रुपयांची मागणी केली. शिक्षण हक्क कायद्याचा आधार घेऊन रिटाने केलेली याचिका ६ जून रोजी प्रथम सुनावणीस आली, तेव्हा शाळेतर्फे कोणीही वकील हजर नव्हता. शाळेला २४ तारखेला हजर होण्याची नोटीस काढली गेली व त्या दिवशी कोणी हजर राहिले नाही, तर याचिकाकर्त्याच्या बाजूने एकतर्फी अंतरिम आदेश दिला जाईल, असे न्यायालयाने त्या दिवशीच्या आदेशात नमूद केले, तसेच विकासशुल्काचा आग्रह न धरता, शाळेने कार्तिकला प्रवेश देण्याचा विचार करावा, असेही न्यायालयाने सांगितले.शुक्रवारी सुनावणी झाली, तेव्हा शाळेचे वकील हजर होते. रिटाच्या वकिलाने न्यायालयास सांगितले की, शाळा आता १०,५०० रुपये फी भरण्यास सांगत आहे. एवढी रक्कम एकदम भरणे शक्य नाही. हप्त्याने फी भरण्याची रिटाची तयारी आहे, परंतु शाळा त्यासाठी तयार नाही. उलट रिटाला आत येऊ देऊ नका, असे शाळेने वॉचमनला सांगितले आहे, असे रिटाचे वकील प्रकाश वाघ यांनी न्यायालयास सांगितले.केंद्र सरकारचे वकील अ‍ॅड. रुई रॉड्रिग्ज यांनीही शाळेने हप्त्याने फी घेऊन प्रवेश देण्यास अनुकूलता दर्शविली व शिक्षणहक्क कायद्यात योग्य प्रकरणांत अशी सवलत देण्याची तरतूद आहे, याकडे लक्ष वेधले. या पार्श्वभूमीवर न्या. कानडे शाळेच्या वकिलास उद्देशून म्हणाले, ‘हे मूल शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी कृपया सहानुभूतीने विचार करा, अन्यथा आपण आपल्या खिशातून फी भरू,’ असेही न्या. कानडे म्हणाले. (विशेष प्रतिनिधी)लेखी नोंद नाही : शुक्रवारच्या सुनावणीनंतर खंडपीठाने या प्रकरणात कोणताही औपचारिक आदेश दिलेला नाही. त्यामुळे शाळेने सहानुभूतीने विचार करावा, अन्यथा आपण फी भरू, या न्यायमूर्तींच्या वक्तव्याची न्यायालयाच्या रेकॉर्डवर लेखी नोंद नाही. सुनावणीच्या वेळी न्यायमूर्ती जे काही बोलतात, ते सर्व न्यायालयाच्या रेकॉर्डवर लेखी स्वरूपात नोंदले जाते, असे नाही.