शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

साहित्य जल्लोषची जय्यत तयारी

By admin | Updated: November 19, 2016 03:33 IST

वसई नगरीत उद्या रविवारी एकदिवसीय साहित्य जल्लोष प्रतिष्ठान आयोजित साहित्य संमेलनाची जोरदार तयारी सुरू आहे.

वसई : ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा असलेल्या वसई नगरीत उद्या रविवारी एकदिवसीय साहित्य जल्लोष प्रतिष्ठान आयोजित साहित्य संमेलनाची जोरदार तयारी सुरू आहे. वसई विरार महानगरपालिका, ग्रंथालय विभाग व साहित्य जल्लोष प्रतिष्ठानने हे १७ वे संमेलन आयोजित केले आहे.रविवारी सकाळी ग्रंथदिंडी, उद्घाटन सोहळा, परिसंवाद, कवीसंमेलन, महाराष्ट्र महोत्सव हा पोवाडा, गोंधळ, शाहिरी व भारूडाचा सांस्कृतिक कार्यक्रम अशी भरगच्च संमेलनाची कार्यक्रम पत्रिका बनली आहे. वसईतील नवे-जुने लेखक, कवी, साहित्यिक, प्रकाशक, विद्यार्थी, प्राध्यापक, लोकप्रतिनिधी, प्राचार्य असे सर्वच प्रथित यश या संमेलनासाठी झटत आहेत. वसई पारनाका येथून सकाळी ९ वाजता ग्रंथदिंडी निघणार आहे. त्यात मराठी भाषेचा जागर होणार आहे.फलक, घोषणा, विविध वेशभूषा हे ग्रंथदिंडीचे वैशिष्ट्य असणार आहे. पालखीत विविध धर्माचे ग्रंथ असणार आहेत. या संमेलनात ज्येष्ठ नाटककार व पत्रकार जयंत पवार, माजी न्यायमूर्ती सी.एस.थूळ, लेखक सुभाष देशमुख, कादंबरीकार रमेश इंगळे उत्रादकर, अभिराम भडकमकर, प्रगती बाणखेले, डॉ. महेश केळुस्कर, साहेबराव ठाणगे, महापौर प्रविणा ठाकूर आदी मान्यवर उपस्थित असणार आहेत. त्याशिवाय पालघर जिल्ह्यातील नवे-जुने लेखक, कवी यांचाही सहभाग मोठा असणार आहे. (प्रतिनिधी) >सर्वदूरचे साहित्य रसिक लावणार हजेरीवसई पारनाका येथील अनंतराव ठाकूर नाट्यगृहात दिवसभर चालणाऱ्या या संमेलनासाठी शाळा, महाविद्यालयांचे विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षक हे मोठ्या संख्येने हजेरी लावणार आहेत. त्याशिवाय सर्वदूरचे साहित्य रसिक यांची उपस्थिती असणार आहे. पालिकेच्या परिवहन सेवेतर्फे विरार, नालासोपारा, अर्नाळा, वसई येथून रसिकांना संमेलन स्थळी येण्यासाठी खास बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. साहित्य जल्लोषचे अध्यक्ष प्रा. कोडोलिकर, अ‍ॅण्ड्र्यू कोलासो, सचिव अशोक मुळे, संदेश जाधव, प्रकाश वनमाळी, अजीव पाटील आदी मान्यवर परिश्रम घेत आहेत.