शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

बॉम्बस्फोट घडविण्याची इसिसची तयारी !

By admin | Updated: January 23, 2016 03:55 IST

राज्यात प्रजासत्ताक दिनी बॉम्बस्फोट घडविण्याचा कट महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथक (एटीएस) आणि राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) दोन तरुणांना अटक करून उधळून लावला आहे

डिप्पी वांकाणी ,  मुंबईराज्यात प्रजासत्ताक दिनी बॉम्बस्फोट घडविण्याचा कट महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथक (एटीएस) आणि राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) दोन तरुणांना अटक करून उधळून लावला आहे. सिरियातील युद्धात भाग घेण्यासाठी इसिसचे समर्थक आतापर्यंत तिकडे जायचे; परंतु आता त्यांनी भारताविरुद्ध हल्ल्याचा पवित्रा घेतल्याने तपास यंत्रणा अधिक सतर्क झाल्या आहेत.मुदब्बीर शेख याच्या अटकेनंतर खान मोहम्मद हुसेन या व्यावसायिकालाही दोन तपास यंत्रणांनी संयुक्त कारवाईत शुक्रवारी रात्री ९ वाजता अटक केली. बॉम्ब तयार करून प्रजासत्ताक दिनी घातपात घडविण्याचा घडविण्याच्या प्रयत्नांत तो होता, असे एटीएसमधील सूत्रांनी ‘लोकमत’ला सांगितले. तर खान मोहम्मद हुसेन हा मुदब्बीरशी संपर्कात होता आणि आणखी काही लोक या कामासाठी भरती करण्याची जबाबदारी हुसेनवर होती.इस्लामिक स्टेट आॅफ इराक अ‍ॅण्ड सिरियासाठी (इसिस) मुदब्बीर शेख हा भारतात मोठा भरती (रिक्रुटर) करणारा होता. मुदब्बीर हा ‘अन्सार उल तौहीद’शी संबंधित होता. अन्सार उल तौहीदची स्थापना तालिबानसाठी इंडियन मुजाहिदीनमधून फुटून बाहेर पडलेल्या गटाने केली होती. भारतविरोधात कारवाया करण्यासाठी सध्या तो इसिसशी जोडला गेलेला आहे.शुक्रवार सकाळीच एटीएसचे १२ आणि एनआयएचे चार अधिकारी आणि १६ पोलीस कर्मचाऱ्यांनी शेखच्या घरावर छापा टाकला आणि त्याला अटक केली. त्यावेळी तेथून दोन लाख रुपये रोख आणि तीन इलेक्ट्रॉनिक साधने जप्त केली. शेख हा या गटाचा स्वयंघोषित ‘आमिर’ असून त्यांनी या गटाला ‘जानूद-उल- खलिफा-ए-हिंद’ असे नावही दिले आहे. मुदब्बीर शेख हा यंत्रणांच्या हाती लागण्यात उशीर झाला असता तर त्याने त्याच्या सहकाऱ्यांच्या मदतीने बॉम्बस्फोट घडविला असता. त्याचा वापर करणारी विदेशी व्यक्ती कोण हेही आम्ही ओळखले असून ती व्यक्ती स्वत:ला ‘युसुफ’ म्हणविते, अशी माहिती तपास यंत्रणेतील एका अधिकाऱ्याने दिली.