शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

चाकरमान्यांची ‘प्रीमियम’ लूट

By admin | Updated: August 26, 2014 04:16 IST

गणेशोत्सवासाठी कोकणात लाखोंच्या संख्येने जाणाऱ्या सर्वसामान्य चाकरमान्यांना एसटी आणि खाजगी वाहतूक सेवांपेक्षा स्वस्त आणि जलद सेवा असलेल्या रेल्वेचा खूप मोठा आधार वाटतो

मुंबई : गणेशोत्सवासाठी कोकणात लाखोंच्या संख्येने जाणाऱ्या सर्वसामान्य चाकरमान्यांना एसटी आणि खाजगी वाहतूक सेवांपेक्षा स्वस्त आणि जलद सेवा असलेल्या रेल्वेचा खूप मोठा आधार वाटतो. म्हणूनच विशेष ट्रेनची संख्या गणेशोत्सवकाळात वाढवण्यात यावी, अशी मागणी वारंवार केली जाते आणि त्याप्रमाणे मध्य, पश्चिम आणि कोकण रेल्वेकडून सोयही करण्यात येते. मात्र यंदा जादा आणि विशेष ट्रेनच्या नावाखाली रेल्वेकडून ४६ ‘प्रिमियम’ (अधिमूल्य, चढाभाव) ट्रेनही चालवण्यात आल्या असून या ट्रेनच्या तिकिट सेवेतून मोठी लूट चालवण्यात येत आहे. या प्रिमियम ट्रेनचे अवाढव्य वाढत जाणाऱ्या भाड्यामुळे कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांनी त्याकडे पाठ फिरवली आहे. गणेशोत्सवकाळात रेल्वेचे तिकिट मिळवताना बरीच मारामार करावी लागत असल्याने अनेक जण एसटीचा पर्याय निवडतात आणि त्यामुळे या काळात एसटी हाऊसफुल्ल होऊन जातात. तरीही काहीजण रेल्वेला गर्दी असतानाही तिकिटांच्या किंमतीकडे पाहून उभ्यानेही प्रवास करणे पसंत करतात. एकूणच प्रत्येक वर्षी वाढत जाणारी गर्दी पाहता रेल्वेकडून यंदा जादा आणि विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला. मागील वर्षी साधारण १२0 विशेष गाड्या सोडण्यात आल्या होत्या. यंदा १९८ विशेष ट्रेन सोडण्यात आल्या असून यात ४६ ट्रेन एसी प्रिमियम ट्रेन सोडण्यात आल्या आहेत. मात्र प्रिमियम ट्रेनचे तिकिट वाढत्या मागणीनुसार वाढत जात असल्याने एका तिकिटांची किंमत ही एक हजार रुपयांपासून ते चार हजार रुपये आणि त्याही पुढे जात आहे. त्यामुळे कोकणात जाणाऱ्या सर्वसामान्य प्रवाशांना हे तिकिट परवडणारे नसल्याने अनेक जणांनी या ट्रेनकडे पाठ फिरवली आहे. मुळात या काळात प्रवाशांची गर्दी आटोक्यात राहावी आणि त्यांचा प्रवास सुकर व्हावा यानिमित्ताने जादा आणि विशेष गाड्या सोडण्याऐवजी अशा न परवडणाऱ्या ४६ प्रिमियम ट्रेन सोडून रेल्वेने नेमके काय साध्य केले असा प्रश्न चाकरमान्यांना सतावू लागला आहे. याबाबत रेल्वे अधिकाऱ्यांकडून मात्र कुठलेही ठोस असे उत्तरही देण्यात येत नसल्याचे दिसून आले. (प्रतिनिधी)