शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

प्रेमप्रकरणातून खून, प्रियकराला जन्मठेप

By admin | Updated: June 27, 2016 20:27 IST

माझे तुझ्यावर प्रेम असून तू मला किंमत का देत नाही, असे म्हणत घरासमोर राहणाऱ्या विवाहितेचा विनयभंग करीत रॉकेल टाकून पेटवून दिल्याप्रकरणी आरोपी संजय जगन्नाथ भोसले

पंढरपूर सत्र न्यायालयाचा निकाल : विनयभंगप्रकरणी सक्तमजुरी

पंढरपूर : माझे तुझ्यावर प्रेम असून तू मला किंमत का देत नाही, असे म्हणत घरासमोर राहणाऱ्या विवाहितेचा विनयभंग करीत रॉकेल टाकून पेटवून दिल्याप्रकरणी आरोपी संजय जगन्नाथ भोसले (वय २४, रा. हुन्नुर, ता. मंगळवेढा) यास पंढरपूरचे अतिरिक्त सत्र न्या. पी. आर. पाटील यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. हुन्नूर (ता. मंगळवेढा) येथील राधिका दीपक इंगोले या पतीसोबत पटत नसल्यामुळे आपल्या मुलीसह आईवडीलांकडे राहत होता. याचा गैरफायदा घेत घरासमोर राहणारा संजय जगन्नाथ भोसले हा नेहमी तू मला आवडत असून माझे तुझ्यावर प्रेम आहे. तू माझ्याशी का बोलत नाही, असा नेहमी म्हणत त्रास देत होता. याप्रकरणी सदर विवाहितेने मंगळवेढा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. याचा राग मनात धरत १३ फेबु्रवारी २०१४ रोजी आरोपीने घरामध्ये कोणी नसल्याचा फायदा घेत तू माझ्याविरूध्द पोलिसात तक्रार का केली असे म्हणत सोबत आणलेले रॉकेल अंगावर टाकून विवाहितेला पेटवून दिले. सोलापूर येथे उपचार सुरू असताना विवाहितेचा मृत्यू झाल्याने मंगळवेढा पोलिसात गुन्हा दाखल झाला होता. याप्रकरणी पंढरपूर सत्र न्यायालयात सुनावणी होवून साक्षीदार, तपासिक अंमलदार व सरकारी वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरत न्या. पी. आर. पाटील यांनी आरोपीस खून प्रकरणी जन्मठेप व पाच हजार रूपये दंड, विनयभंग प्रकरणी दोन वर्षे सक्तमजूरी व तीन हजार दंड, जीवंत जाळल्याप्रकरणी दोन वर्षे सक्तमजूरी व तीन हजार दंडाची शिक्षा सुनावली. या सर्व शिक्षा एकत्रित भोगायच्या आहेत. यात सरकारतर्फे अ‍ॅड. सारंग वांगीकर, अ‍ॅड. गोरे, अ‍ॅड. इनायतअली शेख, अ‍ॅड. रामपुरे, अ‍ॅड. कुर्डूकर तर मुळ फिर्यादीतर्फे अ‍ॅड सारंग काकडे, अ‍ॅड. चव्हाण यांनी काम पाहिले.