शहरं
Join us  
Trending Stories
1
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
2
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
3
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
4
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
5
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
6
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
7
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
8
Shefali Jariwala: बायकोच्या अस्थी हृदयाला कवटाळल्या अन् ढसाढसा रडला, बघवत नाहीये पराग त्यागीची अवस्था
9
३०,००० एकर जमीन, १५० कोटींचे रत्न भंडार अन्.. जगन्नाथ मंदिराची संपत्ती पाहून डोळे विस्फारतील
10
Triumph Trident: बाईक प्रेमींना मोठं सरप्राईज मिळणार? लवकरच बाजारात येतेय ट्रायम्फ ट्रायडंट ६६० स्पेशल एडिशन
11
एक एकर नांगरणीसाठी केवळ ३०० रुपये खर्च, देशातील पहिल्या ई- ट्रॅक्टरची ठाण्यात नोंदणी, परिवहन मंत्री म्हणाले...   
12
10th Pass Job: दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी उच्च न्यायालयात नोकरी, संधी सोडू नका!
13
'वेडेपणा अन् विनाशकारी निर्णय...', ट्रम्प यांच्या 'बिग ब्यूटीफुल' विधेयकावर मस्क यांची जहरी टीका
14
लाटांमुळे तोल गेला अन्... हाजी अली समुद्रात अस्थी विसर्जन करताना दोघांचा मृत्यू, एकाला वाचवलं
15
"४० वर्षांचा संसार मोडून तिने..." महुआ मोईत्रा आणि कल्याण बॅनर्जींमध्ये जुंपली, म्हणाले, "मला उपदेश देतेय"
16
"मराठीचे मारेकरी, हिंदीचे सेवेकरी" मनसेचा फडणवीसांना टोला, शेअर केला 'असा' फोटो!
17
षटकार ठोकला आणि मैदानात पडला, हृदयविकाराच्या झटक्याने फलंदाजाचा मृत्यू  
18
Jagannath Yatra: जगन्नाथ यात्रेला गालबोट! पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू, १० जखमी
19
मुलांना वाढवणं सोप्प नाही! जन्मापासून कॉलेजपर्यंतच्या खर्चाचा आकडा वाचून डोळे होतील पांढरे
20
भारत-पाकिस्तान सीमेवर दोन मृतदेह आढळले, जवळच पडले होते पाकिस्तानी सिम, ओळखपत्रे

गर्भवतीला पोलिसाकडून धक्काबुक्की?

By admin | Updated: August 10, 2016 04:34 IST

पोलीस कर्मचाऱ्याने एका गर्भवतीला धक्काबुक्की केल्याचा कथित प्रकार अंधेरी पश्चिम येथील तहसीलदार कार्यालयासमोर सोमवारी सायंकाळी घडला.

मुंबई : पोलीस कर्मचाऱ्याने एका गर्भवतीला धक्काबुक्की केल्याचा कथित प्रकार अंधेरी पश्चिम येथील तहसीलदार कार्यालयासमोर सोमवारी सायंकाळी घडला. संबंधित महिलेने पोलिसाविरुद्ध कारवाईची मागणी केली आहे. संगीता पवार असे या महिलेचे नाव आहे. संगीता या तहसीलदार कार्यालयात त्यांच्या मामेभावाचे डोमिसाईल प्रमाणपत्र आणण्यासाठी गेल्या होत्या. संध्याकाळी ६च्या सुमारास त्या कार्यालयाच्या बाकावर बसून फॉर्म भरत असताना नायब तहसीलदार चवरे आणि त्यांचे अंगरक्षक पोलीस शिपाई गोरखनाथ जाधव त्या ठिकाणी आले. यांनी पवार यांना कार्यालय बंद असून, तुम्ही इथून निघून जा असे सांगितले. मात्र बाहेर पाऊस आहे आणि मी पतीची वाट पाहत आहे, असे सांगितले. तरीदेखील त्यांनी हुज्जत घातली. पवार यांचे पती विश्वजीत तिथे पोहोचले आणि असभ्य वर्तनाचा जाब त्यांनी चवरे आणि जाधव यांना विचारला. तेव्हा जाधवने त्यांच्या श्रीमुखात भडकावली, असे विश्वजीत यांनी सांगितले. त्यानंतर या जोडप्याला डी. एन. नगर पोलीस ठाण्यात नेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच रात्री १२ वाजेपर्यंत बसवून नंतर सोडण्यात आले, असे दाम्पत्याचे म्हणणे आहे.महिला ही नायब तहसीलदाराशी बाचाबाची करत असल्याने तिने त्यांच्याशी नीट बोलावे, असे सांगितले. तेव्हा तिने आणि तिच्या पतीने त्या पोलीस शिपायालाच धक्काबुक्की केली, असे डी. एन. नगरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक धनाजी नलावडे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)