शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

भोंदूच्या उपचारांमुळे गर्भवतीचा मृत्यू

By admin | Updated: June 9, 2016 05:53 IST

राज्यात जादुटोणाविरोधी विधेयक पारित होऊनही, अंधश्रद्धेमुळे जाणारे बळी पूर्णपणे रोखण्यात शासन आणि समाजाला अद्यापही यश आलेले नाही

गडचिरोली : राज्यात जादुटोणाविरोधी विधेयक पारित होऊनही, अंधश्रद्धेमुळे जाणारे बळी पूर्णपणे रोखण्यात शासन आणि समाजाला अद्यापही यश आलेले नाही. एटापल्ली तालुक्यातील दुर्गम भाग असलेल्या बुर्गी येथील मीना संतोष हिचामी या २० वर्षीय गर्भवती महिलेचाही सोमवारी अंधश्रद्धेने बळी घेतला आहे. काविळीच्या आजारावर ती गेले १५ दिवस तुमरगुंडा येथील भोंदू पुजाऱ्याकडे उपचार घेत होती.१८ मे रोजी पोटात दुखत असल्याने मीनाने बुर्गी प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारही घेतले होते. त्यानंतर तिला एटापल्ली ग्रामीण रुग्णालयात आणि उपजिल्हा रुग्णालय अहेरी येथे हलविण्यात आले. तेथे १८ ते २४ मे या कालावधीत उपचार करून तिला सुटी देण्यात आली होती, अशी माहिती मीना पती संतोष याने दिली. मीनाला कावीळ, सिकलसेलचा आजार असल्याने अहेरी उपजिल्हा रुग्णालयातून सुटी मिळाल्यावर २४ मे पासून तिला येमली येथील पुजाऱ्याकडे ठेवण्यात आले होते. ५ जूनला रात्री मीनाची तब्येत झपाट्याने खालावली व तिला तुमरगुंडा गावात माहेरी आणण्यात आले. तुमरगुंडा येथे आणून त्या रात्री तुमरगुंडा गावातील पुजाऱ्याकडे तिच्यावर पुन्हा उपचार सुरू झाले. (प्रतिनिधी)>अंगणवाडी सेविकेचे दुर्लक्षबुर्गी प्राथमिक आरोग्य उपकेंद्रांतर्गत गर्भवती मातांना पोषण आहार पुरविण्याची जबाबदारी अंगणवाडी सेविकेकडे आहे व आरोग्य तपासणीचीही जबाबदारी अंगणवाडी सेविका व आशा वर्कर यांच्याकडे आहे. परंतु तब्बल १५ दिवस पुजाऱ्याकडे या महिलेवर उपचार सुरू असताना आरोग्य यंत्रणेच्या या कर्मचाऱ्यांना ही माहिती कशी मिळाली नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे.मीना हिचामी या महिलेचा मृत्यू आरोग्य विभागाच्या दुर्लक्षामुळे झालेला नाही. या महिलेने पुजाऱ्याकडे उपचार केल्यामुळे तिचा मृत्यू झाला. तिला काविळ व सिकलसेल आजार होता. असे मृत्यू टाळण्यासाठी कोणत्याही रुग्णांनी पुजाऱ्यांकडे उपचार घेऊ नये.- डॉ. पवन राऊत, प्रभारी तालुका आरोग्य अधिकारी, एटापल्ली.