शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
4
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
5
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
6
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
7
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
8
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
9
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
10
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
11
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
12
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
13
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
14
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
15
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
16
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
17
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
18
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
19
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
20
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

सार्वजनिक वाहतूक सुधारण्यास प्राधान्य - राज्य सरकार

By admin | Updated: January 29, 2016 01:59 IST

मुंबईतील वाहनांच्या संख्येवर नियंत्रण करण्यासाठी सम-विषम प्रयोग करण्यापूर्वी सार्वजनिक वाहतूक प्रणाली सुधारणे आवश्यक आहे, असे राज्य सरकारने गुरुवारी उच्च न्यायालयाला सांगितले.

मुंबई : मुंबईतील वाहनांच्या संख्येवर नियंत्रण करण्यासाठी सम-विषम प्रयोग करण्यापूर्वी सार्वजनिक वाहतूक प्रणाली सुधारणे आवश्यक आहे, असे राज्य सरकारने गुरुवारी उच्च न्यायालयाला सांगितले.मुंबईतील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर प्रचंड ताण पडत आहे. त्यामुळे काहीही निर्णय घेण्यापूर्वी सरकारला सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुधारणे आणि त्याची क्षमता वाढवण्यावर भर द्यावा लागणार आहे, असे या केसमधील विशेष सरकारी वकील एस. के. नायर यांनी न्या. व्ही. एम. कानडे व न्या. रेवती मोहिते- ढेरे यांच्या खंडपीठाला सांगितले.उपनगरीय लोकलची क्षमता १,६०० असताना पिक अवरमध्ये याच लोकमधून ४,७०० पेक्षा अधिक प्रवासी प्रवास करतात. तर बेस्टच्या प्रत्येक चौ. मी वर १२ प्रवासी उभे असतात. मुंबईच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर दुप्पट ताण पडत असल्याची बाब अ‍ॅड. नायर यांनी खंडपीठाच्या निदर्शनास आणली. मुंबईतील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची क्षमता कशी वाढवण्यात येईल, याचा अभ्यास करण्यासाठी तज्ज्ञांच्या दोन समित्या नेमण्यात आल्या आहेत, असे म्हणत या समित्यांचा अहवाल सादर करण्यासाठी अ‍ॅड. नायर यांनी काही दिवसांची मुदत खंडपीठाकडून मागून घेतली.मुंबईतील वाढती वाहन संख्या आणि त्यामुळे होणारे हवेचे प्रदूषण यासंदर्भात दाखल करण्यात आलेल्या याचिकांवर सरकारी वकीलांनी वरील माहिती खंडपीठाला दिली. त्याशिवाय दिल्लीप्रमाणे मुंबईतही ‘सम-विषम’ नंबर असलेल्या वाहनांचा प्रयोग करून पहावा, अशी मागणी करणारी जनहित याचिकाही सामाजिक कार्यकर्ते शदाब पटेल यांनी उच्च न्यायालयात दाखल केली आहे. वायु प्रदूषण कमी व्हावे, यासाठी याचिका दाखल केली आहे.तर दुसरी याचिका बॉम्बे एन्वॉयरोन्मेंट अ‍ॅक्शन ग्रुप या एनजीओने १९९९ मध्ये दाखल केली आहे. मुंबईवरील रस्त्यांवरून धावणाऱ्या वाहनांच्या संख्येला आळा बसावा, यासाठी व्ही. एम. लाल समितीने केलेल्या शिफारशींची अंमलबजावणी करण्यात यावी, यासाठी या समितीने उच्च न्यायालयात नोटीस आॅफ मोशन दाखल केले. हायकोर्टाने या याचिकांवरील सुनावणी ९ फेब्रुवारी रोजी ठेवत वाहनांमुळे होणारे हवेचे प्रदूषण रोखण्यासाठी काय पावले उचललीत आणि यापुढे कोणत्या प्रतिबंधात्मक उपाययोजना आखणार? ही माहिती देण्याचे निर्देश राज्य सरकारला दिले. (प्रतिनिधी)