शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
2
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
3
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
4
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
5
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
6
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
7
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
8
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
9
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
10
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
11
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
12
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली
13
Anaya Sanjay Bangar, IND vs ENG: अनाया बांगरचे वडील संजय बांगरने इंग्लंड दौऱ्यावर टीम इंडियाकडून केलेली धमाकेदार खेळी
14
Share Market Update : सलग दुसऱ्या दिवशी बाजार घसरला! निफ्टी बँक तेजीत, पण इतर ठिकाणी विक्रीचा जोर, पाहा आजचे आकडे!
15
नोकरीला कंटाळलात? फक्त २०,००० रुपयांमध्ये सुरू करा 'हे' ४ छोटे व्यवसाय, दरमहा बंपर कमाईची संधी!
16
Raj Kushwaha : "सोनमने तिच्या पतीला खाल्लं आणि आता..." असं म्हणणाऱ्या राजच्या आजीचा झाला मृत्यू
17
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
18
सोशल मीडियावर व्हायरल झालेले खान सर निवडणूक लढवणार?,'आप'च्या संजय सिंह यांची भेट घेतली
19
२४ वर्षाच्या युवतीचा कारनामा, ८ बॉयफ्रेंडकडून लुटले २५ लाख; नवव्याला फसवणार होती, पण... 

‘स्मार्ट सिटी’चे स्वप्न साकारण्यास प्राधान्य

By admin | Updated: April 29, 2016 01:55 IST

राज्यात पिंपरी-चिंचवड शहराचा चांगला लौकिक आहे. या ठिकाणी विकासाला भरपूर वाव आहे.

पिंपरी : राज्यात पिंपरी-चिंचवड शहराचा चांगला लौकिक आहे. या ठिकाणी विकासाला भरपूर वाव आहे. शहरातील नागरिकांचे ‘स्मार्ट सिटी’चे स्वप्न साकारण्यास माझे प्राधान्य राहणार आहे, असा संकल्प महापालिकेचे नवनियुक्त आयुक्त दिनेश वाघमारे यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला. महापालिका आयुक्त राजीव जाधव यांच्या बदलीची अनेक दिवसांपासून चर्चा होती. अखेर बुधवारी रात्री उशिरा त्यावर शिक्कामोर्तब झाले. नवी मुंबईचे आयुक्त दिनेश वाघमारे यांची पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ‘लोकमत’शी बोलताना आयुक्त वाघमारे म्हणाले की, ‘‘औद्योगिकनगरी, बेस्ट सिटी, आयटी हब असलेले शहर अशी पिंपरी-चिंचवडची ओळख आहे. या शहराच्या विकासाबाबत आणि नवनवीन प्रकल्पांबाबत आजपर्यंत ऐकत आलो आहे. मात्र, आता याच शहरात काम करण्याची संधी मिळाली आहे. आयुक्तपदी काम करीत असताना शहराला आणखी प्रगतिपथावर नेण्यासाठी सुरुवातीपासूनच योग्य नियोजन करण्याचा प्रयत्न राहील. शहराचे नागरीकरण दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. त्या दृष्टीने सुविधा पुरविणेही आवश्यक आहे. पायाभूत सुविधा पुरविण्यास प्राधान्य दिले जाईल. प्रशासकीय कामकाजात गतिमानता आणण्यासाठी आवश्यक ते बदल केले जातील. यासह शहराला भेडसावणारे प्रश्न सोडविण्यास प्राधान्य दिले जाणार आहे. शहराला स्मार्ट सिटी बनविण्यासाठी योग्य नियोजन केले जाईल. शहराला चाळीस वर्षांचा इतिहास आहे. इथे काम करण्याची संधी मला मिळाली आहे. नवी मुंबईसारख्या महानगरात काम केल्याच्या अनुभवाचा शहराचे नियोजन व विकास करताना उपयोग होईल, अशी माझी धारणा आहे. (प्रतिनिधी)