शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

अंबिल ओढा कार्यालयाकडून रेशनकार्डांचे बेसुमार वाटप

By admin | Updated: May 10, 2014 20:41 IST

अन्नधान्य वितरण कार्यालयाच्या ९ परिमंडळ कार्यालयांमध्ये आंबिल ओढा येथील ह कार्यालयाने गेल्या ७ महिन्यांमध्ये तब्बल १६ हजार ३०० रेशनकार्डांचे बेसुमार वाटप करून एक नवा विक्रम प्रस्थातिप केला आहे.

पुणे : अन्नधान्य वितरण कार्यालयाच्या ९ परिमंडळ कार्यालयांमध्ये आंबिल ओढा येथील ह कार्यालयाने गेल्या ७ महिन्यांमध्ये तब्बल १६ हजार ३०० रेशनकार्डांचे बेसुमार वाटप करून एक नवा विक्रम प्रस्थातिप केला आहे. आंबिल ओढा कार्यालयाकडून एवढया मोठया प्रमाणात रेशनकार्ड का घेतले जात आहेत, त्यांच्याकडून व्यवस्थित वाटप झाले आहे का याची चौकशी करण्याची गरज अद्याप अन्नधान्य वितरण कार्यालयास वाटलेली नाही.परिमंडळ ह कार्यालयातून कोरे रेशनकार्ड गहाळ होणे, कागदपत्रांची व्यवस्थित पूर्तता केली नसतानाही कागदपत्रांचे वाटप करणे, सहायक परिमंडळ अधिकार्‍यांना रेशनकार्डवर सही करण्याचे अधिकार नसताना बेकायदेशीरपणे सहया करून रेशनकार्डांचे वाटप करणे असे असंख्य गैरप्रकार उजेडात आले. यापार्श्वभुमीवर लोकहित फौऊंडेशनचे अध्यक्ष अजहर खान यांनी अन्नधान्य वितरण कार्यालयाकडून सप्तेंबर २०१३ ते मार्च २०१४ या ७ महिन्यांच्या काळात शहरातील ८ परिमंडळ कार्यालयांना किती रेशनकार्डांचे वाटप याची माहिती घेतली.परिमंडळ ह कार्यालय सरासरी दिवसाला १०० रेशनकार्डांचे वाटप करून एक नवा विक्रम प्रस्थापित केला असल्याचे आढळून आले आहे. या कार्यालयाकडून पिवळे, केशरी व शुभ्र अशा १६ हजार ३०० रेशनकार्डांचे वितरण करण्यात आले आहे. त्यानंतर इ परिमंडळाने ६ हजार ५५०, फ परिमंडळाने ५३९३, क परिमंडळाने ४ हजार ७५९, अ परिमंडळाने ४ हजार ५५० रेशनकार्डांचे वितरण केले आहे. ग परिमंडळ कार्यालयाने सर्वात कमी ६५० रेशनकार्डांचे वितरण केले आहे.परिमंडळ कार्यालयाकडून आलेल्या मागणीनुसार अन्नधान्य कार्यालयाकडून त्यांना रेशनकार्ड दिले जाते. मात्र कोणत्या कार्यालयास किती रेशनकार्ड दिले, त्याचा त्यांनी व्यवस्थित लेखाजोखा ठेवला आहे का याची मात्र कोणतीही तपासणी केली जात नसल्याचे आढळून आले आहे.जिल्हाधिकारांकडे फाइल प्रलंबितआंबिल ओढा येथील ह परिमंडळ कार्यालयातून कोरे रेशनकार्ड गहाळ झाल्याप्रकरणी अन्नधान्य वितरण कार्यालयाकडून विभागीय चौकशी करण्यात आली. चौकशीमध्ये गैरकारभार झाल्याचे निष्पन्न झाल्याने संबंबिधत अधिकार्‍यांवर कारवाई करण्याची शिफारस जिल्हाधिकारी सौरभ राव यांच्याकडे एक महिन्यापूर्वी करण्यात आली आहे. मात्र एक महिना उलटला तरी अद्याप जिल्हाधिकार्‍यांनी त्यावर निर्णय घेतलेला नाही. परिमंडळपिवळीकेशरीशुभ्रएकुण५५०३५००५००४५५०२५५००३०० ८२५१००४५५९१००४७५९१००३९०४६००४६०४३००४५५०१७००६५५०४५०४४९३४५०५३९३५०४००२०० ६५०१०००८५००६८००१६३००