शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

‘प्रवरा’ने सामाजिक बांधिलकी जपली

By admin | Updated: August 11, 2014 03:06 IST

सहकाराच्या माध्यमातून ग्रामीण भागात उभ्या राहिलेल्या ‘प्रवरा मॉडेल’ने सामाजिक वातावरण टिकवण्यास हातभार लावला आहे.

बाभळेश्वर (जि. अहमदनगर) : सहकाराच्या माध्यमातून ग्रामीण भागात उभ्या राहिलेल्या ‘प्रवरा मॉडेल’ने सामाजिक वातावरण टिकवण्यास हातभार लावला आहे. साहित्यिकांबरोबरच राज्य सरकारनेही सामाजिक बांधिलकीतून घेतलेल्या निर्णयामुळे सजग सामाजिक, सांस्कृतिक वातावरणाची परंपरा टिकवून ठेवण्यात यश आले, असे प्रतिपादन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.सहकारी साखर कारखानदारीचे जनक पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या ११४व्या जयंतीनिमित्त साहित्य आणि कला गौरव पुरस्काराचे वितरण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. फ. मु. शिंदे अध्यक्षस्थानी होते. कृषिमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, राज्यमंत्री सुरेश धस आदी कार्यक्रमाला उपस्थित होते. पद्मश्री विखे पाटील यांच्या नावाने देण्यात येणारा साहित्यसेवा जीवनगौरव पुरस्कार डॉ. म. सु. पाटील यांना, तर कलागौरव पुरस्कार मोमिन कौठेकर यांना प्रदान करण्यात आला. राज्यस्तरीय उत्कृष्ट साहित्य पुरस्कार भारत सासणे, समाजप्रबोधन पुरस्कार महामंडलेश्वर डॉ. रामकृष्णदास लहवीतकर, प्रवरा परिसर उत्कृष्ट साहित्य पुरस्कार सुदर्शन दहातोंडे, नाट्यसेवा पुरस्कार अनिल क्षीरसागर यांना मुख्यमंत्री चव्हाण आणि फ. मु. शिंदे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. डॉ. बाळासाहेब विखे म्हणाले, जिरायती भागासाठी वरदान असलेल्या निळवंडे प्रकल्पाबाबत मुख्यमंत्र्यांनी तातडीने निर्णय घेऊन दिलासाद्यावा. पाऊस नसल्याने खरीप पीक वाया गेले असून, रब्बीची पेरणी अनेक ठिकाणी झालेली नसल्याने दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी त्यांनी केली. फ. मु. शिंदे यांनी एकमेकांचे दु:ख वाहून घेणे हा साहित्याचा धर्म असल्याचे सांगत कवितेच्या माध्यमातून राजकारणी व समाजकारण्यांचे त्यांनी मार्मिक विवेचन केले. (वार्ताहर)