शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

आत्महत्येपुर्वी प्रत्युषा बॅनर्जीने केला होता गर्भपात

By admin | Updated: April 19, 2016 11:13 IST

प्रत्युषा बॅनर्जी गर्भवती होती आणि आत्महत्या करण्यापुर्वी तिने गर्भपात केली असल्याची माहिती समोर आली आहे

ऑनलाइन लोकमत  - 
मुंबई, दि. १९ - अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जी आत्महत्येप्रकरणी नवा खुलासा समोर आला आहे. प्रत्युषा बॅनर्जी गर्भवती होती आणि आत्महत्या करण्यापुर्वी तिने गर्भपात केली असल्याची माहिती समोर आली आहे. जे जे रुग्णालयाच्या डॉक्टरांनी या माहितीला दुजोरा दिला आहे. 1 एप्रिलला प्रत्युषा बॅनर्जीने आपल्या राहत्या घरी आत्महत्या केली होती.
 
टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार आत्महत्या करण्याच्या काही महिने अगोदर प्रत्युषा बॅनर्जी गर्भवती होती. तसंच गर्भपातदेखील करण्यात आला होता. मात्र पोलिसांना या मुलाचा पिता कोण होतं ? हे सिद्ध करणं कठीण जाणार असल्याचं मत काही तज्ञांनी व्यक्त केलं आहे. सध्या कोणताच पुरावा हाती नसल्याने डीएनए चाचणी करुन मुलाचे वडील कोण आहेत सिद्ध करणं आव्हानात्मक असेल.
 
प्रत्युषा बॅनर्जीने गर्भपात केला तेव्हा नेमके किती महिने झाले होते याची माहिती मात्र मिळू शकलेली नाही. 'आम्ही कोणतीही माहिती उघड करु शकत नाही, आम्ही रिपोर्ट पोलिसांच्या हवाली केला आहे', अशी माहिती जेजे हॉस्पिटलचे डीन तात्याराव लहाने यांनी दिली आहे. 
 
प्रत्युषा बॅनर्जीच्या आत्महत्येमुळे राहुल राज सिंगसोबत असणारे संबंध उघड झाले होते. पोलीस सध्या राहुल राज सिंगची चौकशी करत असून त्यानेच आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा पोलिसांना संशय आहे. प्रत्युषावर विषप्रयोग करण्यात आला होता का याची तपासणी कलिन फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीमध्ये केली जात आहे. तसंच डीएनए चाचणीसाठी केस, नख आणि रक्ताचे नमुने जपून ठेवण्यात आले आहेतय