शहरं
Join us  
Trending Stories
1
GST' नंतर आता सरकार आणखी एक दिलासा देणार! 'ट्रम्प टॅरिफ'च्या टेन्शनमधून व्यावसायिक मुक्त होतील
2
"...का तूच खातो सगळं रेटून? आम्हाला तर माहीत आहे, या जीआरवरच संपूर्ण मराठवाडा बसतो!"; भुजबळांना डीवचत जरांगेंचा दावा!
3
भारत-चीन ट्रम्प यांच्यावर त्यांचंच जाळ फेकणार; 'बाल्ड ईगल'ला झटका बसणार, लवकरच येणार नवी 'पेमेंट सिस्टम'?
4
Sri Lanka Bus Accident: पर्यटकांची बस थेट १००० फूट खोल दरीत कोसळली; १५ ठार, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
5
राष्ट्रवादी काँग्रेसचे १९ सप्टेंबरला नागपूरमध्ये चिंतन शिबिर; कोणकोणत्या विषयांवर होणार चर्चा?
6
Thane: बायकोने गर्लफेंडसोबत नको त्या अवस्थेत पकडलं; नवऱ्याने ऐरोलीच्या खाडीत मारली उडी, पण...
7
एअरटेलचा सर्वात महागडा रिचार्ज प्लॅन; एका वर्षासाठी मिळणार अनलिमिटेड बेनिफिट्स, काय-काय आहे?
8
शनिवारी अनंत चतुर्दशी २०२५: साडेसाती, शनि महादशा सुरू आहे? ‘हे’ उपाय तारतील अन् भरभराट होईल
9
६ दिवसांत 'रॉकेट' बनला सेमीकंटक्टर कंपनीचा शेअर; पंतप्रधान मोदींचा या क्षेत्रावर आहे फोकस
10
“राज-उद्धव ठाकरे बंधूंच्या घट्ट युतीतून मुंबईत मराठी माणूस महापौर होईल”; संजय राऊतांचा दावा
11
हा खरा गणेशोत्सव! परभणीत गणेश मंडळाकडून जोडप्याचे शुभमंगल, संसारोपयोगी साहित्य भेट!
12
लग्नाला सहा महिनेही झाले नव्हते, अचानक एक दिवस पत्नी बेपत्ता, व्हॉट्सअपवर पतीला फोटो आला...
13
Apple च्या भारतातील गुंतवणूकीवर ट्रम्प नाराज; टिम कुक यांना सर्वांसमोर थेट प्रश्न विचारला...
14
Astro Tips: तुमची ग्रहस्थिती 'ही' असेल तर शेअर मार्केटमध्ये होतो लाभ, अन्यथा सुपडा साफ!
15
अरे बापरे! महाराष्ट्रात वाघांनी घेतला २१८ जणांच्या नरडीचा घोट, देशात सर्वाधिक हल्ले राज्यात
16
प्रताप सरनाईकांनी घेतली देशातील पहिली Tesla Model Y कार; नातवाला दिली भेट, म्हणाले...
17
रणबीर कपूरशी संबंधित 'या' कंपनीच्या शेअरमध्ये मोठी तेजी; ब्लॉक डीलनंतर शेअरने गाठले अप्पर सर्किट
18
दिल्लीहून इंदूरला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचे आपत्कालीन लँडिंग, विमानात १६१ प्रवासी होते
19
मुस्लीम, शेतकऱ्यांसाठीही मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन करा; मनोज जरांगेंच्या मुख्यमंत्र्यांकडे नवीन मागण्या काय?
20
No Cost EMI: फुकट काहीच नाही, समजून घ्या गणित; खरंच व्याज द्यावं लागत नाही का?

राम का गुणगान करिए...

By admin | Updated: November 26, 2014 01:07 IST

लोकमत वृत्तपत्र समूहाचे संस्थापक संपादक, ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी श्रद्धेय जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ मंगळवारी भावपूर्ण स्वरसुमनांजलीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

श्रद्धेय जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांना भावपूर्ण स्वरसुमनांजली नागपूर : लोकमत वृत्तपत्र समूहाचे संस्थापक संपादक, ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी श्रद्धेय जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ मंगळवारी भावपूर्ण स्वरसुमनांजलीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. सकाळची पावित्र्याने भरलेली वेळ आणि बाबूजींच्या आठवणींचा गहिवर असणाऱ्या या कार्यक्रमात भजन, अभंगांचे सुरेल सादरीकरण करण्यात आले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने यावेळी उपस्थित ईश्वराच्या संकीर्तनात रमले. लोकमत भवनातील जवाहरलाल दर्डा कलाविथिकेत या स्वरसुमनांजलीचे आयोजन करण्यात आले. पल्लवी कुंभारे यांनी सुरेल तान छेडून ‘गगन सदन तेजोमय...’ या प्रार्थनागीताने कार्यक्रमाला प्रारंभ केला. बाबूजींच्या प्रसन्न मुद्रेतल्या छायाचित्राला पुष्पांजली अर्पण करून कार्यक्रमाचा प्रारंभ माजी आमदार यादवराव देवगडे यांच्या हस्ते करण्यात आला. गायिका पल्लवी यांनी पहिल्याच गीताने बाबूजींच्या स्मृतिनिमित्त आयोजित कार्यक्रमाची वातावरणनिर्मिती साधली. याप्रसंगी त्यांनी ‘सुंदर ते ध्यान उभे विटेवरी..., अरे राम भजो अरे राम भजो..., राम का गुणगान करीए...’ आदी भक्तीगीते सादर करून कार्यक्रमाची उंची वाढविली. यानंतर पल्लवी कुंभारे यांना सहगायक म्हणून संवादिनीवर साथ देणाऱ्या प्रशांत भिंगारे यांनी ‘आया हूं दरबार तुम्हारे...’ हे भजन सादर केले. या सुरेल कार्यक्रमाचा समारोप पल्लवी कुंभारे यांनी महात्मा गांधी यांचे आवडते भजन ‘वैष्णव जन तो तेणे कहिए...’ या भक्तीगीताने केला. याप्रसंगी लोकमत परिवारातील सदस्य विजय नगरकर यांनी ‘अनंता तुला कोण पाहू शके...’ हा अभंग सादर करून उपस्थितांना तल्लीन केले. गायकांना तबल्यावर अनुप तायडे, मायनरवर महेश काळे यांनी साथसंगत केली. ध्वनिव्यवस्था अशोक दुरुगकर यांची होती. या कार्यक्रमाचे नेटके संयत निवेदन सुनील कोंगे यांनी केले. या कार्यक्रमाला शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते. श्रद्धेय बाबूजींच्या प्रतिमेला भावपूर्णतेने पुष्पांजली अर्पण करून याप्रसंगी उपस्थित श्रोते बाबूजींचे स्मरण करीत होते. कार्यक्रमाला लोकमत परिवारातील ज्येष्ठ सदस्य विंग कमांडर रमेश बोरा, युनिट हेड नीलेश सिंग, हेमंतराव गावंडे उपस्थित होते. (प्रतिनिधी)