शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

निती आयोगाच्या बैठकीत फडणवीसांच्या कामाचे कौतुक

By admin | Updated: April 24, 2017 03:01 IST

निती आयोगाच्या बैठकीत येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र सरकारच्या योजना आणि भविष्याची रणनीती याबाबत खुली चर्चा केली

नितीन अग्रवाल / नवी दिल्लीनिती आयोगाच्या बैठकीत येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र सरकारच्या योजना आणि भविष्याची रणनीती याबाबत खुली चर्चा केली. राज्यात कृषि क्षेत्रात करण्यात आलेल्या कार्याबाबत यावेळी फडणवीस यांची पाठ थोपटण्यात आली. फडणवीस यांनी यावेळी शेती क्षेत्रातील योजनांवर भाष्य केले. डाळींचे उत्पन्न वाढण्यासाठी त्यांनी काही सल्ले दिले. आयात धोरणात सुधारणा घडवून आणण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. विदर्भ आणि मराठवाडा या दुष्काळाच्या छायेत राहणाऱ्या भागात सिंचन प्रकल्पांसाठी त्यांनी केंद्राकडे आर्थिक सहकार्याची मागणी केली. राज्यातील जलयुक्त शिवार योजनेचा उल्लेख करुन ते म्हणाले की, या योजनेमुळे कृषि क्षेत्रात १२.५ टक्क्यांचा विकास दर गाठता आला. कृषि क्षेत्रातील गुंतवणूक, व्यावसायिक नेटवर्क आणि पायाभूत सुविधात झालेल्या सुधारणा याबाबत त्यांनी विस्ताराने माहिती दिली. ग्राम पंचायतींना हायस्पीड इंटरनेटने जोडण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या राज्य सरकारच्या महानेट योजनेसाठी केंद्र सरकारने मदत करावी, असे आवाहन त्यांनी केले. डिजिटल प्रणालीच्या माध्यमातून चांगल्या सेवा देण्यात येत आहेत. प्रशासनाच्या या प्रयत्नांचाही त्यांनी उल्लेख केला. सार्वजनिक वायफाय आणि डिजिटल ग्राम यासारख्या राज्य सरकारच्या योजनांचीही त्यांनी माहिती दिली. निती आयोगाच्या या बैठकीत महाराष्ट्र सरकारच्या कामाचे कौतुक झाले. कृषि आणि सिंचन क्षेत्रातील सरकारच्या कामाचे विशेष कौतुक करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत भारतात बदल घडवून आणण्यासाठी १५ वर्षांचा रोडमॅप सादर करण्यात आला.