जळगाव : घरकूल प्रकरणातील आरोपी व माजी महापौर प्रदीप रायसोनी यांना शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला आहे. साडेतीन वर्षांपासून कारागृहात असलेल्या रायसोनी यांना धुळे येथे वास्तव्यास राहण्याचेही आदेश न्यायालयाने दिले आहेत.माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर व विजय कोल्हे यांना याआधी जामीन मंजूर झाला आहे. रायसोनी यांनी जिल्हा, उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयात ११ वेळा जामिनासाठी अर्ज केला होता. (प्रतिनिधी)
प्रदीप रायसोनी यांना सशर्त जामीन
By admin | Updated: July 4, 2015 02:59 IST