शहरं
Join us  
Trending Stories
1
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
2
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
3
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट
4
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
5
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
6
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
7
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
8
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
9
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
10
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
11
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
12
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
13
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!
14
PHOTOS: जसप्रीत बुमराहच्या बाजूला बसून हळूच हसणारी 'ती' तरूणी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल...
15
COVID19: महाराष्ट्रावरचं कोरोना संकट आणखी गडद, आज १२ नव्या रुणांची नोंद, २४ तासात एकाचा मृत्यू
16
उद्धव-राज ठाकरेंसंदर्भात रामदास आठवले यांची मोठी भाविष्यवाणी, म्हणाले, 'आमच्या महायुतीला...!'
17
जयजयकार...मराठी शक्तीचा, 'ठाकरे ब्रँड'वरील भक्तीचा! उद्धव-राज एकत्र येतात तेव्हा...
18
आशा आहे, मी आणखी 30-40 वर्षे जगेन आणि...; दलाई लामांकडून उत्तराधिकारी वादाला पूर्णविराम
19
"डोळे आणि मन आज तृप्त झालं...", ठाकरे बंधू एकत्र, मराठी अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
20
"हिंदी सक्ती मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याआधीची चाचपणी होती"; राज ठाकरे यांचा गंभीर आरोप

मुंबईच्या वेशीवर जोरदार शक्तिप्रदर्शन

By admin | Updated: September 22, 2016 05:29 IST

राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात गर्दीचे विक्रम करणाऱ्या मराठा क्रांती मूक मोर्चाने मुंबईच्या वेशीवर विराट शक्तिप्रदर्शन केले.

पनवेल : राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात गर्दीचे विक्रम करणाऱ्या मराठा क्रांती मूक मोर्चाने मुंबईच्या वेशीवर विराट शक्तिप्रदर्शन केले. कोकणभवनवर काढण्यात आलेल्या मोर्चामध्ये रायगड व नवी मुंबईमधील चार लाखांपेक्षा जास्त नागरिक सहभागी झाले होते. मुंबई, ठाणे, रायगड जिल्ह्याच्या इतिहासामधील सर्वात शिस्तबद्ध व विशाल मोर्चाचा नवीन विक्रम या आंदोलनाने प्रस्थापित केला आहे. जगातील सर्वात मोठ्या शेतकऱ्यांच्या संपाची पार्श्वभूमी असलेल्या रायगड जिल्ह्यामध्ये मराठा क्रांती मोर्चाने गर्दीचे आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडीत काढले. मराठा क्रांती मूक मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी रायगड जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यामधून मराठा समाजातील नागरिक पहाटेपासूनच सेंट्रल पार्कमध्ये येऊ लागले होते. भगवे झेंडे व हाताला काळ्या फिती लावून बस, कार, टेम्पो, ट्रेनने नागरिक मोर्चाच्या ठिकाणी सहभागी होऊ लागले होते. १२ वाजता जवळपास चार लाख नागरिक सेंट्रल पार्कवरून महामार्गाच्या सर्व्हिस रोडवरून कोकणभवनकडे निघाले. कुठेही घोषणाबाजी नाही. नेत्यांची भाषणे नाहीत, नि:शब्द मोर्चातून मराठा समाजाने शिस्तीचे दर्शन घडविले. मोर्चामध्ये दोन वर्षांच्या मुलांपासून ८० वर्षांच्या वृद्धांपर्यंत सर्व नागरिक सहभागी झाले होते. सीबीडीमधील महाकाली चौकामध्ये कोपर्डीमध्ये हत्या झालेल्या तरुणीला श्रद्धांजली अर्पण करून चार मुलींनी कोकण आयुक्त प्रभाकर देशमुख यांना मागण्यांचे निवेदन दिले. (प्रतिनिधी)>मराठा क्रांती मोर्चाची वैशिष्ट्ये मोर्चामध्ये चार लाखांपेक्षा जास्त नागरिकांचा सहभाग नवी मुंबई, रायगडच्या इतिहासामधील सर्वाधिक गर्दी सीबीडी ते खारघरमध्ये दोन किलोमीटरची रांगप्रकल्पग्रस्तांचाही सहभाग दोन ते दहा वर्षे वयोगटातील मुलांचाही लक्षणीय सहभाग महिलांची उपस्थिती लक्षणीय मोर्चासाठी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती बंद मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी चाकरमान्यांनी घेतली सुटी या मोर्चानंतर स्वयंसेवकांनी पूर्ण मार्ग स्वच्छ केला स्वयंशिस्तीचे पोलिसांनीही केले कौतुक>सर्वपक्षीय नेते सहभागी : मोर्चामध्ये सर्वात पुढे निवेदन देणाऱ्या चार तरुणी, त्यांच्या पाठीमागे महिला व सर्वात शेवटी नेत्यांचा सहभाग होता. या मोर्चात आमदार शशिकांत शिंदे, भरत गोगावले, नरेंद्र पाटील, प्रवीण दरेकर, सुरेश लाडही एक नागरिक म्हणून सहभागी झाले होते. महिला व मुलांची संख्या लक्षणीय होती.