शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

32 कोटी 84 लाखांच्या थकबाकीपोटी 75,109 ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित

By admin | Updated: December 26, 2016 20:30 IST

वीजबिलांचा भरणा न करणार्‍या 75,109 ग्राहकांचा वीजपुरवठा 32 कोटी 84 लाखांच्या थकबाकीपोटी खंडित करण्यात आला

ऑनलाइन लोकमत

सोलापूर, दि. 26 - पश्चिम महाराष्ट्रात थकीत वीजबिलांचा भरणा न करणार्‍या 75,109 ग्राहकांचा वीजपुरवठा 32 कोटी 84 लाखांच्या थकबाकीपोटी खंडित करण्यात आला आहे. थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याची महावितरणची धडक मोहीम तीव्र झाली असून, गेल्या 23 दिवसांत ही कारवाई करण्यात आली आहे.वीजबिलांच्या थकबाकीचे प्रमाण वाढल्यास महावितरणला आर्थिक प्रश्नांना सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे दरमहा वीजबिलांसह वीजग्राहकांकडे असलेल्या थकबाकीची वसुली करण्यासाठी मोहीम राबविण्याचे निर्देश प्रादेशिक संचालक संजय ताकसांडे यांनी दिले आहेत. त्यानुसार पुणे, कोल्हापूर, सांगली, सोलापूर व सातारा या पाचही जिल्ह्यांत थकीत वीजबिलांच्या वसुलीसाठी वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम तीव्र झाली आहे. यात वारंवार आवाहन करूनही थकीत वीजबिल न भरणार्‍या 75,109 थकबाकीदारांचा वीजपुरवठा गेल्या 23 दिवसांत खंडित करण्यात आला आहे. या ग्राहकांकडे 32 कोटी 84 लाख रुपये थकीत आहेत.लघुदाब घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक थकबाकीदारांविरुद्ध सुरू असलेल्या धडक कारवाईत (थकबाकी) पुणे जिल्हा - 36,105 (23 कोटी 43 लाख), कोल्हापूर जिल्हा - 9,794 (2 कोटी 57 लाख), सांगली जिल्हा - 5,187 (94 लाख 88 हजार), सोलापूर जिल्हा - 19,124 (4 कोटी 54 लाख) तर सातारा जिल्ह्यात 4,899 ग्राहकांचा (1 कोटी 35 लाख) वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे.वीजपुरवठा खंडित करण्याची थकबाकीदारांनी कटू कारवाई व संभाव्य गैरसोय टाळण्यासाठी थकीत देयकांचा त्वरित भरणा करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे. थकबाकीदारांविरोधात सुरू असलेली धडक मोहीम यापुढेही सुरू राहणार आहे. वीजबिलांबाबत ग्राहकांच्या तक्रारी असल्यास त्याचे त्वरित निराकरण करण्यात येणार आहे. थकीत वीजबिलांचा भरण्यासाठी स्थानिक वीजबील भरणा केद्गांसह व घरबसल्या ऑनलाईन पेमेंटसाठी महावितरणची www.mahadiscom.in  ही वेबसाईट तसेच Mahavitaran App या मोबाईल अ‍ॅपचा पर्याय उपलब्ध आहे.एकाच दिवशी साडे सहा हजार थकबाकीदारांची वीज खंडितथकीत वीजबिलांपोटी वीजपुरवठा खंडित करण्याच्या मोहिमेत शुक्रवारी, 23 रोजी पश्चिम महाराष्ट्रातील 6,435 थकबाकीदारांचा वीजपुरवठा 86 लाख 71 हजार रुपयांच्या थकीत बिलांपोटी खंडित करण्यात आला. शून्य थकबाकीच्या संकल्पनेनुसार ही मोहीम राबविण्यात येत आहे. त्यामुळे अधिकारी, कर्मचार्‍यांसह मुख्य अभियंता, अधीक्षक अभियंता दर्जाचे वरिष्ठ अधिकारी व त्यांचे स्वतंत्र पथकेही या धडक मोहिमेत सहभागी झाले आहेत. खंडित करण्यात आलेल्या वीजजोडणीतून थकीत वीजबिलाचा भरणा न करता वीजवापर होत असल्यास संबंधित ग्राहकाविरुद्ध नियमानुसार कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.