पुणे : शिवस्पर्शाने पुनीत झालेले किमान ५ किल्ले निवडून राज्य सरकारने त्या किल्ल्यांना ऊर्जितावस्था प्राप्त करून द्यावी, असा ठराव दुर्ग साहित्य संमेलनाच्या समारोप समारंभात करण्यात आला.समारोप समारंभात एकूण ३ ठराव संमत करण्यात आले. त्यापैकी गोनीदांचे जन्मशताब्दी वर्ष ८ जुलै २०१५ पासून सुरू होत आहे. त्यानिमित्त मंडळाने आजीव संमेलन सदस्य नोंदणीचाही ठराव संमत केला आहे. तसेच शिवजयंतीला शिवनेरीवरील कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी किल्ल्यांच्या संवर्धनासाठी महामंडळ स्थापनेची घोषणा केली आहे. त्याचेही गोनीदा दुर्गप्रेमी मंडळाने स्वागत केले असून महामंडळाला सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन या वेळी दिले. या उपक्रमातून महाराष्ट्रातील दुरवस्था झालेल्या किल्ल्यांचे जतन आणि संवर्धन व्हावे, अशी अपेक्षा या वेळी व्यक्त करण्यात आली. (प्रतिनिधी)
किमान ५ किल्ल्यांना ऊर्जितावस्था द्यावी
By admin | Updated: February 23, 2015 02:46 IST