शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

जनतेची ताकद माझ्यासोबत

By admin | Updated: November 7, 2016 06:11 IST

निवडणुका येतात जातात जय पराजय होत राहतो, सत्ता असली आणि नसली तरी लोकांचा विकास करण्याची दानत असली पाहिजे.

माणगाव (रायगड) : निवडणुका येतात जातात जय पराजय होत राहतो, सत्ता असली आणि नसली तरी लोकांचा विकास करण्याची दानत असली पाहिजे. सत्ता कोणाचीही असो रायगडात विकास मी करतोय तो जनतेच्या आशीर्वादावरती, कारण जनतेची खरी ताकद माझ्याच सोबत आहे. कुणी कितीही राजकारण केले तरी माझ्या पाठीशी असणाऱ्या लोकांच्या ताकदीला हात लावण्याची हिंमत कोणामध्येच नाही, असा विश्वास राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. सुनील तटकरे यांनी व्यक्त केला.माणगाव तालुक्यातील लोणेरे येथे आयोजित राष्ट्रवादी पक्षाच्या मेळाव्यात ते बोलत होते. लोणेरे येथे विभागातील राष्ट्रवादी काँग्रेसतर्फेआयोजित पक्षप्रवेश व रायगड भूषण पुरस्कार विजेत्यांचा सत्कार सोहळा समारंभ संपन्न झाला. यावेळी व्यासपीठावर संपर्क नेते प्रमोद घोसाळकर, तालुकाध्यक्ष बाबूराव भोनकर, सभापती अलका केकाणे, राम टेंबे, राजिप सदस्या राधिका तटकरे आदी उपस्थित होते. रायगड जिल्हा परिषदेने रायगड भूषण पुरस्काराने सन्मानित केलेल्या अण्णा उचाटे,घनश्याम घोसाळकर, मजीद लोखंडे व सत्यभामा ढेपे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी लोणरे ग्रामपंचायत सदस्य शिवाजी टेंबे, सीमा जाधव यांच्यासह युवा कार्यकर्ते समाधान करकरे, शैलेश टेंबे, दर्शना टेंबे, बाळाराम टेंबे यांच्यासह शेकडो शिवसैनिकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला.केंद्रीय मंत्री अनंत गीते यांचा समाचार घेताना जनतेप्रति संवेदना नसलेला खासदार रायगडातून गेला अशी बोचरी टीका तटकरे यांनी केली. विकास आणि जनसेवा या सिद्धांतावर कधी आयुष्यात त्यांनी काम केले नाही. मुख्यमंत्री पदाच्या जोडीचे मंत्रीपद केंद्रीय मंत्रिमंडळात मिळाले आहे,परंतु जनतेची सेवा करण्याची जाण त्यांना राहिली नाही. त्यांनी फक्त दुसऱ्यांवर टीका करूनच राजकारण करण्यात धन्यता मानली. त्यांना आगामी काळात जनताच धडा शिकवेल. सत्ता असली आणि नसली तरी लोकांची कामे होणारच यासाठी मी वचनबध्द असल्याचे आश्वासन तटकरे यांनी दिले. (वार्ताहर)