शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

‘भाजपाची कामे दिसू लागल्यामुळे पोटशूळ’

By admin | Updated: July 13, 2017 02:04 IST

भाजपाची कामे दिसू लागल्यामुळे शीतल म्हात्रे यांनी राजशिष्टाचाराचा मुद्दा उपस्थित केला असावा

मनोहर कुंभेजकर लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : भाजपाची कामे दिसू लागल्यामुळे शीतल म्हात्रे यांनी राजशिष्टाचाराचा मुद्दा उपस्थित केला असावा, असे स्पष्ट मत, उत्तर मुंबई भाजपा सरचिटणीस आणि मुंबई महानगर पलिकेतील भाजपाचे स्वीकृत नगरसेवक गणेश खणकर यांनी केले. ‘प्रभागात खासदार आमदारांची घुसखोरी’ या संदर्भात ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिद्ध झाले होते. या वृत्ताचे उत्तर मुंबईत जोरदार पडसाद उमटले. स्थानिक नगरसेवकांना विश्वासात न घेता, महापालिका अधिकाऱ्यांसोबत भाजपा आमदार व खासदार यांचे कार्यक्रम ठरविले जात असल्याबद्दल, आर/ मध्य व आर/उत्तर प्रभाग समितीच्या अध्यक्षा नगरसेविका शीतल म्हात्रे यांनी तक्रार केली आहे. ही तक्रार करताना, आर मध्य आणि आर उत्तरच्या प्रभाग समिती अध्यक्ष व प्रभाग क्रमांक सातच्या शिवसेना नगरसेविका शीतल मुकेश म्हात्रे यांनी त्याला राजशिष्टाचाराचा मुलामाही दिल्याचे पत्रात नमूद केले आहे. एवढी वर्षे भारतीय जनता पक्ष संधीची वाट पाहत होता, संधी मिळाल्यानंतर भाजपाच्या लोकप्रतिनिधींनी केलेल्या कामामुळे उत्तर मुंबईतून महापालिकेत ४२ पैकी २४ नगरसेवक भाजपाचे निवडून गेले आहेत. गेली अनेक वर्षे दहिसर विभागात शिवसेनेचे नगरसेवक सातत्याने निवडून येत आहेत. प्रभाग समितीही बराच काळ शिवसेनेच्या ताब्यात होती, असे असूनही दहिसर नदीच्या बाबतीत कुठलाच ठोस कार्यक्रम अथवा दहिसर नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी कुठलेच पाऊल उचलले गेलेले नाही. परंतु गेल्या विधानसभेत दहिसर विधानसभेतून मनिषा चौधरी भारतीय जनता पक्षातर्फे निवडून आल्या. त्यांनी दहिसर नदीच्या विषयात हात घालून काम सुरू केले. अनेक सामाजिक संस्था यात जोडल्या गेल्या आहेत. मोठ्या प्रमाणावर नागरिकही यात सहभागी होत आहेत. शासकीय पातळीवर या संदर्भात हालचालीही सुरू झाल्या आहेत. यापूर्वी दहिसर विधानसभेत विनोद घोसाळकर शिवसेनेचे आमदार असताना, हा सवाल शीतल म्हात्रे यांनी का उपस्थित केला नाही? असा सवालही खणकर यांनी पत्राद्वारे उपस्थित केला आहे.